सरकार तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात! जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad's allegation : "तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेचे मंदिर लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे असे म्हणत या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीतुळजापूर येथे जाऊन तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे. सरकारचे कृत्य म्हणजे हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे असे म्हणत तुळजापूर येथे मंदिराला भेट दिल्यानंतर आपण भाविकांत याबाबत जनजागृती केली असेही त्यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 12, 2025
याविरोधात आज तुळजापूर… pic.twitter.com/RsAeCp5JQA
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत आरोप केला की, "तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे."
"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!"
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 12, 2025
तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास.
पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे… pic.twitter.com/G8wvCMntK8
"इतिहासाचा खून - तोही आपल्या डोळ्यांदेखत!" - आव्हाड
जितेंद्र आव्हाडांनी म्हटले की, "तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर - हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास आहे. येथील पहिली रचना - अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात झाली असून त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे."
वारसा पाडून टाकण्याचा प्रयत्न!- आव्हाड
जितेंद्र आव्हाडयांनी आरोपात म्हटले की, "आता... 'विकास' या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहेत! इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार?" असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो?
आव्हाड यांनी संस्कृती आणि इतिहासावर मत व्यक्त करताना "विकास म्हणजे वारसा संपवणं नाही! छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे - ती संस्कृतीवरची तोडफोड आहे, आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो? असा सवालही त्यांनी केला."
"आता आवाज उठवा! उद्या कदाचित सांगावं लागेल"
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये हेही म्हटले की, "इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं... मग कुणीतरी त्याला 'अपग्रेड' केलं! ही फक्त वास्तू नाही - हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी,लोकांनी पुढे यावे" असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या!
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात दर्शन आणि पाहणी केल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भाजपच्या कार्यकर्ते यावेळी संतप्त झाले आणि आक्रमक पावित्रा राबवत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या दिला. दरम्यान आपला विकासाला विरोध नाही पण त्याच्या नावाखाली वारसा संपवणं मान्य नाही.












Click it and Unblock the Notifications