तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळायची धमकी देणार! चलता है, फक्त लक्षात ठेवा.. 'या' नेत्याचा इशारा

ठाणे : ठाण्याचे पोलिस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. विरोधी पक्षातील नेत्याचा जीवजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे, असा हल्लाबाेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सद्वारे केली आहे.

शनिवारी ठाण्यात सभेपूर्वी शिवसनेचे अध्यक्ष उद्दधव ठाकरे यांच्या वाहनावर मनसेच्या 30 ते 35 जणांनी हल्ला केला. याच हल्ल्याच्या पाश्र्वभूममीवर आव्डाड यांनी सतधधाऱ्यांवर हा हल्लाबाेल केला आहे.

Jitendra Awad on Raj Thackeray over Uddhav Thackeray s vehicle attack case

जितेंद्र आव्हाडाकडून व्हिडिओ पोस्ट

आमदार आव्हाड यांनी साेशल मिडीयाद्वारे एक्सवर व्यक्त केलेल्या आपल्या टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतांना त्यांच्या वाहनावर जवळून काहीतरी फेणणारा एक आंदाेलक स्पष्ट दिसत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी पाेस्ट केला आहे.

त्यासाेबतच त्यांनी म्हटले आहे की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

..म्हणून पोलिस दलाची मानसिकता अशी झाली

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपला अधिकारीच इतका झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलिस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे संपूर्ण जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आले नाही

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त इतकेच लक्षात ठेवा, की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा इशाराही आव्हाड यांनी ठाकरे यांच्या वाहनावर मनसैनिकांनी शनिवारी केलेल्या हल्ल्याबाबत दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+