एकाच दिवसांत हेमंत बिस्वा यांचा यू-टर्न; झारखंड निवडणुकीबाबत म्हणाले...
Hemant Biswa Sarma's U-turn- झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर एकाच दिवसात आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली. पूर्वेकडील राज्यात आम्ही जिंकू असा दावा मी केलाच नव्हता, असं म्हणत त्यांनी आपल्या विधानावरुन यू-टर्न घेतला.

झारखंडमध्ये पुन्हा जेएमएम
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने इंडिया आघाडीसोबत ही निवडणूक जिंकली. जेएमएमने सलग दुसऱ्यांदा सत्तेत काबीज केली. इंडिया आघाडीने या निवडणुकीत 56 जागा जिंकल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला फक्त 24 जागा जिंकता आल्या. हेमंत बिस्वा सरमा हे झारखंड निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी होते.
काय म्हणाले हेमंत बिस्वा सरमा
गुवाहाटी येथील एका पत्रकार परिषदेत हेमंत बिस्वा म्हणाले, "जेव्हा माध्यमांनी मला झारखंडच्या निवडणुकीबद्दल विचारले होते, तेव्हा ते एक कठीण राज्य आहे असे मी सांगितले होते. आम्ही जिंकूच हा दावा मी कधीही केला नव्हता. ही निवडणूक जिंकणे हे आमच्यासाठी कठीण होते. परिस्थिती आमच्या विरोधात होती मात्र आम्ही तेथे चांगले काम केले." विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत विस्वा हे झारखंडमध्ये तळ ठोकून होते. बांग्लादेशी घुसखोर पूर्वेकडील राज्याला धोका निर्माण करत असल्याचा दावा, त्यांनी केला होता.
घुसखोरीचा मुद्यावर आहेत ठाम
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा हे घुसखोरीच्या मुद्यावर ठाम आहेत. ते म्हणाले, "घुसखोरीच्या विरोधात कारवाई करणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे. आसामचा मुख्यमंत्री या नात्याने मी यापुढे या विषयावर भाष्य करणार नाही. मात्र घुसखोरीच्या बाबतीत कोणत्याही सरकारने तडजोड करू नये, असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यानंतर शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमंत बिस्वा यांनी भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांना विधानसभेत हा मुद्दा उठवण्याची पुन्हा विनंती केली.












Click it and Unblock the Notifications