पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! जालन्याजवळ जीप विहिरीत कोसळून 6 जण ठार
जालना - पंढरपूरहून येणाऱ्या विठ्ठल भाविकांवर काळाने घाला घातला. विठ्ठल भाविकांची काळीपिवळी विहिरीत पडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. हा अपघात जालना ते राजूर मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ संध्याकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, राजूर रोडवरील तूपेवाडी येथे एका विहिरीत काळी पिवळी पडल्याची प्राथमिक माहिती, चंदनझिरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कसा घडला अपघात?
पंढरपुराहून देवदर्शन करून गावी परतत असताना ही गंभीर घटना घडली. जालना ते राजूर मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटले, अन् जीप थेट रस्त्याच्या कड्याला असलेल्या विहिरीत कोसळली. यात अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तर गाडीतील सुमारे 10 पेक्षा अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
..कठडा नसल्याने जीप विहिरीत
ज्या रस्त्यावरुन गाडी जात होती, त्यापरिसरात विहीर होती, पण तिला कठडाच नव्हता. या विहिरीला कठडा नसल्याने जीप थेट पाण्यात पडली. त्यात बसलेले सर्व भाविक पाण्यात पडले. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले आहे.
दरम्यान घटना घडताच त्यावेळी आजूबाजूच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताची माहिती समजताच पोलिसही घटनास्थळी पोहचले. सर्वांच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सहा मृतदेह काढले बाहेर
अपघातस्थळी बचावकार्य सुरु असून आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications