Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाचोऱ्यातील रेल्वे दुर्घटना कशी घडली? अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम, देवेंद्र फडणवीसांना अतीव दुःख!

Jalgaon Pachora train accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेली रेल्वे दुर्घटना नेमकी कशी घडली यासंदर्भात अधिकृत पातळीवर रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत लोकांचे झालेले मृत्यू अतिशय वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले CM फडणवीस?

या दुर्घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत."

Jalgaon Pachora train accident

8 रुग्णवाहिका रवाना

फडणवीस म्हणाले की, "घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे."

मध्य रेल्वेच्या PRO ने सांगितला घटनाक्रम

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, "पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेची चेन ओढली होती. त्यानंतर काही प्रवाशी रेल्वेतून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. त्या प्रवाशांना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडवले. ही रेल्वे बंगळुरूहून दिल्लीकडे जात होती. या घटनेत 7 ते 8 प्रवाशी जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक रुग्णालय व प्रशासनाची मदत घेतली जात आहे. याशिवाय भुसावळ रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन रेल्वे गाडीही घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाली आहे. या प्रकरणी जखमी प्रवाशांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे."

11 जण ठार - खासदार स्मिता वाघ

जळगावच्या भाजप खासदार स्मिता वाघ यांनी या दुर्घटनेत 11 जण ठार झाल्याची माहिती दिली आहे. विशेषतः जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून लोकांच्या मृत्यूसंदर्भात अधिकृत माहिती येणे बाकी आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

7 ते 8 प्रवाशी ठार - जिल्हाधिकारी

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, या घटनेत पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवले आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. या घटनेत 7 ते 8 प्रवाशी ठार झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण 3 रुग्णालयामध्ये दाखल केले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+