महायुतीची सत्ता येताच IPSरश्मी शुक्ला पुन्हा बनल्या महाराष्ट्राच्या DGP! फडणवीसांशी भेट अन् नियुक्ती
IPS Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस दलाचे प्रमुखपद पुन्हा बहाल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डीजीपी रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवले होते. महायुतीची पुन्हा सत्ता येताच त्यांना महासंचालकपद देण्यात आले आहे.
फोन टॅपींग प्रकरण असो की, निवडणूक आयोगने दिलेले निर्देश या घडामोडीनंतरही रश्मी शुक्ला या पुन्हा महाराष्ट्राच्या पोलिस महांचालक पदी विराजमान झाल्या हे विशेष. रश्मी शुक्लांना हटवण्याचे जेव्हा निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांनी महाराष्ट्राचे डीजीपी म्हणून पदभार स्वीकारला होता.

रश्मी शुक्ला यांना का हटवले होते?
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्ला यांची तक्रार केली होती खासकुन शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरणही चांगलेच गाजले होते. नाना पटोले यांच्या मागणीनंतर रश्मी शुक्ला यांना आयोगाने पदावरून हटवले होते. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत संजय वर्मा हे सर्वोच्च पद भूषवले. मागील सरकारच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांना याच कालावधीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
रश्मी शुक्लांना महासंचालकाचा पुन्हा पदभार
तथापि, गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि रविवारी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी अधिकृतपणे आदर्श आचारसंहिता संपुष्टात येण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच रश्मी शुक्ला यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही भेट चर्चेत आली असून त्यांना पुन्हा महासंचालकपद देण्यात आले आहे.
काँग्रेसची पुन्हा आयोगाकडे मागणी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे केली, असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आदर्श आचारसंहिता लागू असताना गृहमंत्री फडणवीस.












Click it and Unblock the Notifications