Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

288 जागांसाठी राज्यभरात किती उमेदवार रिंगणात; किती जणांनी घेतली माघार अन् कितींचे अर्ज फेटाळले, वाचा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता दिवसेंदिवस रगत चढत चाललेली आहे. यंदाची निवडणुक जो कोणी उमेदवार निवडून येणार त्याचे नशीबच बलवत्तर अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. प्रमुख सहा पक्ष, दोन आघाड्या अन् अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता. 23 तारखेला कोणावर गुलाल उधळला जाणार याचे चित्र अगदी स्पष्ट होईल.

अशातच,राजकीय पक्ष आपापल्या राजकीय आघाड्या मजबूत करण्यात व्यस्त आहेत. सोमवारी अर्थात 4 नोव्हेंबर रोजी तीन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता राज्यभरात किती उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. तर किती जणांनी आज दिवसभरात अर्ज माघारी घेतले याची आकडेवारी समोर आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

एवढे उमेदवार आहेत आता मैदानात

निवडणूक आयोगाकडून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण १०,९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५४ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर ९२६० उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता ८२७२ उमेदवार उरले असून २० नोव्हेंबरला कोणाच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचबरोबर काही बंडखोर उमेदवारही अगम्य झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. यात काहींनी अर्ज मागे घेतले तर काहींनी कायम ठेवले आहेत. यामुळे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभे राहिलं आहे.

यंदाची निवडणूक चुरशीची

यावेळची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची लढत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे, जिथे सहा मोठे राजकीय पक्ष दोन मोठ्या आघाड्यांखाली निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात काही जागा अशा आहेत की जिथे अतिशय रोचक लढती अपेक्षित आहेत. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी उमेदवार मैदानात न देण्याचा निर्णयाने आता राज्यात मविआ विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+