महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; संजय राऊतांची मागणी
नवी दिल्ली : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीला अवघे जेमतेम 100 दिवस बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरणारं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ही मागणी करतानाच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचं नेतृत्व केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मविआचे विधानसभेचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचाच चेहरा पुढे केला जाणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. NDA सरकार संजय राऊत यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. अल्पमताचं सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे, किती थापा मारतंय ते पहावं लागेल.
भाजपने बहुमत गमावलं:
केंद्र सरकारवर भाष्य करताना भाजपने बहुमत गमावलं आहे. हे अल्पमताचे सरकार कुंबड्यांवर उभे, असं देखील संजय राऊत म्हटले आहेत.
राहुल गांधींचं मोदींसमोर आव्हान:
खूप वर्षांनी जनतेचा मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळाला आहे. राहुल गांधींनी पदयात्रा काढून संपूर्ण देश फिरले, देशाचे प्रश्न समजून घेतले. ज्याने गेल्या 10 वर्षांत असंख्य घाव झेलले, अपमानाचे कडू घोट पचवले. ते हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता आज नरेंद्र मोदींसमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे:
महायुतीकडून सध्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव पाहता फडणवीस देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात. तर दुसरीकडे अजित पवार समर्थक खूप आधीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर केंद्रीय भाजप नेतृत्व उमेदवार देताना धक्कातंत्र देखील वापरू शकते. राज्यात मराठा - ओबीसी आरक्षण वादात फडणवीस आणि अजित पवार यावेळी मुख्यमंत्री पदी लोकांना मान्य असतील का? हा मोठा प्रश्न आहे. ते एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा पुढे केलं तर आश्चर्य वाटायला नको.
मोदी - शिंदे टीकेचे धनी:
मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख 'नकली शिवसेना' केला होता. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. लोकसभेला आता विरोधी पक्षनेता मिळाला आहे. लोकसभेत आता सत्ताधारी-विरोधक असा सामना पहायला मिळेल, असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे फार लश्र देण्याची गरज नाही, ते भरकटलेलं व्यक्तीमत्व आहे, अशी जोरदार टीकाही राऊतांनी केली.












Click it and Unblock the Notifications