महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे गेले आपल्या मूळ गावी, कारण...
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन व त्यानंतर मंत्रीपदावरुन वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानुसार आज मुंबईत महायुतीचे तिन्ही नेते बैठक घेणार होते. मात्र आता ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हेही आपल्याला साताऱ्यातील मुळ गावी गेले असल्याने ते नाराज आहेत का, या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

महायुतीची बैठक अचानक रद्द
महायुतीची आज होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे कालच गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करुन आले आहेत. त्यानुसार आज मुंबईत या तिन्ही नेत्यांची बैठक होती. मात्र ती अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या आपल्या मुळ गावी गेले. आता ही बैठक भाजपचा गटनेता निवडीनंतर होईल, अशीही माहिती समजत आहे.
खातेवाटपावरुन नाराजीच्या चर्चा
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असले तरी गृहमंत्री व अर्थमंत्री या दोन खात्यासाठी शिवसेना व अजित पवार गट आग्रही असल्याचे समजते. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांची साथ हवी असल्याच्याही चर्चा आहेत. याच खातेवाटपाच्या घोळ अजूनही सुरु असल्यानेच महायुतीत सगळेच अलबेल नसल्याचेही बोलले जात आहे. अजित पवारांना अर्थमंत्री ही जबाबदारी देण्यास भाजपचा ग्रीन सिग्नल असला तरी, गृहमंत्रीपदही भापलाच हवे असल्याने तिढा वाढला आहे.












Click it and Unblock the Notifications