Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित दादांनंतर 'राष्ट्रवादी'चे काय? नेतृत्वाची धुरा कुणाकडे अन् उपमुख्यमंत्री कोण होणार? जाणून घ्या

Future of NCP After Ajit Pawar's Death 5 Big Questions and Succession Plans : २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) कणा होते. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण पक्षावर आभाळ कोसळले आहे. आता प्रश्न उरतो तो दादांच्या राजकीय वारशाचा आणि राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा.

Ajit Pawar Passes Away

राष्ट्रवादीसमोर उभे ठाकलेले ५ महत्त्वाचे प्रश्न

१. पक्षाची कमान आता कोणाकडे, उपमुख्यमंत्री कोण होणार?

अजित पवारांनंतर पक्षात त्यांच्या तोडीचा सर्वमान्य नेता सध्या दिसत नाही. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय आणि राजकीय कामाचा अनुभव असल्याने कार्यकर्त्यांची त्यांना पसंती मिळू शकते. अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा आहे, अजित पवारांनंतर आता त्यांच्यासारखाच अष्टपैलू ्व दिग्गज नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर बसवावा लागेल.

२. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का?

अजित दादांच्या जाण्यानंतर पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची ओढ पुन्हा शरद पवार यांच्याकडे वाढू शकते. नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या नेत्यांनी आधीच एकत्रीकरणाचे संकेत दिले आहेत. "दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण," अशी भावना अनेक आमदार व्यक्त करत आहेत.

३. शरद पवार पुन्हा 'सुपर पॉवर' होणार?

वयाच्या ८५ व्या वर्षीही शरद पवार हेच दोन्ही गटांना एकत्र आणू शकणारे एकमेव नाव आहे. अजित पवारांच्या निधनानंतर विखुरलेली ताकद एकत्र करण्यासाठी शरद पवार पुन्हा सक्रिय होऊन पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेऊ शकतात.

४. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसदार कोण?

अजित दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये लोकसभा लढवली होती, तर धाकटे चिरंजीव जय पवार हे सध्या स्थानिक राजकारणात सक्रिय होत आहेत. बारामतीचा गड राखण्यासाठी आणि दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी या दोन मुलांपैकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

५. महायुतीमधील राष्ट्रवादीचे स्थान काय?

अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटासोबतच्या युतीमधील महत्त्वाचा दुवा होते. त्यांच्या निधनानंतर महायुतीमधील राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. नवीन नेतृत्व महायुतीमध्ये दादांइतकीच पकड ठेवू शकेल का, हा मोठा तांत्रिक प्रश्न आहे.

हेही वाचा : एका 'कॉल'ने हादरले राजकारण अन् अपघाताने संपले वादळ; अजित पवार 6 वेळा DCM ते निधनापर्यंतची गाथा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+