काही लोकांचा दहशतवाद्यांच्या सुरात सूर.. विदेशात देशाला बदनाम करतात- CM शिंदेंचा राहुल गांधींवर आरोप
Eknath shinde: काही लोक विदेशात जाऊन भारताला बदनाम करतात! अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर केली आहे. आरक्षण कुणी मायचा लाल रद्द करु शकत नाही, काँग्रेसला याची फळं मिळतील असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि लाखो लोक उपस्थित आहेत.
मोदींनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मोदींनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला, मागील दहा वर्षांत ग्रामीण भागातील 10 कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. ते आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनचे उद्घाटन करणार आहेत. महिला स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताला महासत्ता बनविण्याचा 14 0 कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण होणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पीएम मित्र पार्क मुळे देशाचा विकासाला हातभार
आम्ही एक हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. या पार्कात दोन लाख रोजगार मिळणार आहे. या मुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
आरक्षण कोणच रद्द करु शकत नाही
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही.
काही लोकांचा दहशतवाद्यांच्या सुरात सूर
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, काही लोक 370 कलम पुन्हा बहाल करू म्हणाताहेत. ते दहशतवाद्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला. हा विकास त्यांना रोखायचा आहे का? असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला सामान्य माणसाचा सन्मान वाढवणं त्यांची ताकद वाढवण्याचं हे काम मोदी करत आहेत. त्यामुळेच मोदींनी वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे मी त्यांचे याबाबत आभार व्यक्त करतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications