आधी फडणवीस आता एकनाथ शिंदेंही म्हणाले- मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण पुढचा सीएम..
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारतोफा थंडावण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले आहेत. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्रात मतदानाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. ते एका माध्यमांशी संवाद साधत होते. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, मी जर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसलो तरी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार हे निश्चित आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एनएनआयशी बोलताना मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते. दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज तकशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे तोडा आणि राज्य करा असे आहे. राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी माझ्या पक्षाची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही, पण उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत गेले. 'एक है तो सेफ है' या पंतप्रधान मोदींच्या घोषणेचे एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले.
फडणवीस काय म्हणाले होते?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भविष्यात पक्ष त्यांच्यासोबत जाणार नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत मला आधीच माहिती होती. मी मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले होते.
एएनआयशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार कुटुंब आणि पक्ष तोडण्यात माहिर आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे तुटली. उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी आमच्याशी संबंध तोडले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आदित्य ठाकरेंना पुढे करायचे होते, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला.
20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना राज्यात पाहायला मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications