Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! मुंबईत बिनधास्त या..! हलक्या वाहनांना पाचही टोल माफ; एकनाथ शिंदे सरकारची मोठी घोषणा

Eknath Shinde government cabinet meeting : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आज महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक सुरु आहे. या बैठकीत पहिल्या तासाभरातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून, या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde government cabinet meeting

कोणते टोल होणार फ्री?

आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. मुंबईत टोलमाफीही केली.

1. आनंदनगर टोलनाका
2. दहिसर टोलनाका
3. मुलुंड-एलबीएस टोलनाका
4. वाशी टोलनाका
5. ऐरोली टोलनाका

राज्याच्या तिजोरीवर सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा भार

आज रात्री बारा वाजल्यापासून मुंबईतील सर्व टोलनाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावा लागणार आहे.

पाच टोलपैकी चार टोलची मुदत 2027 पर्यंत आहे तर एक टोल 2029 पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना टोल वसुली मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार लोकांच्या फायद्याच्या घोषणा करत आहे.

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पट

सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पट केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिक्षकांचे मानधनही दुप्पट केले.

मंत्रिमंडळात झाले 'हे' महत्वाचे निर्णय

1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+