काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा म्हणतात- एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray for becoming CM : "काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा म्हणून सांगतात; पण हा एकनाथ शिंदे दिल्लीत जातो ते फक्त महाराष्ट्राला निधी मिळावा म्हणून, महाराष्ट्रासाठी प्रकल्प मिळावे, महाराष्ट्राच्या योजनांना पैसा मिळावा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना मंजूर व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करतो." असे म्हणत शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली.
साक्री मतदार संघाच्या शिवसेनेच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या प्रचारार्थ दहिवेल येथे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, उमेदवार मंजुळा गावित आदींची उपस्थिती होती.

हे सरकार शेतकऱ्यांचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे आणि सर्वसामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि जेष्ठ नागरिकांसह महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. सोयाबीनला भाव मिळत नाही हे लक्षात येताच मी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारची मदत घेतली आहे.
कापूस सोयाबीनला भाव देणार
सोयाबीनला प्रतिक्विंटल 4892 रुपये आधारभूत किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 15% मॉइश्चर असलेला सोयाबीन देखील खरेदी केला जाणार आहे. सोयाबीन पेंट ला देखील निर्यातीला परवानगी देणार, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच मिडीयम त्रिपल कापसाला 7 हजार 121 आणि लाँग ट्रिपल कापसाला 7 हजार 520 रुपये भावाने नाफेड खरेदी करणार असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता शिंदे यांनी टीका केली. काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा म्हणून सांगतात पण हा एकनाथ शिंदे दिल्लीत जातो ते फक्त महाराष्ट्राला निधी मिळावा म्हणून, महाराष्ट्रासाठी प्रकल्प मिळावे, महाराष्ट्राच्या योजनांना पैसा मिळावा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना मंजूर व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करतो.
मोदी आणि मनमोहनसिंग यांच्यात केली तुलना
केंद्रात असलेल्या पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने दहा वर्षात फक्त दोन लाख कोटी रुपये एवढा निधी दिला. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या घोषणा फक्त आपल्या योजनांची कॉपी आहे.
अरे सरकार काय बंद करण्यासाठी आहे का?
एकनाथ शिंदे म्हणाले, आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हे विरोधक न्यायालयात गेले. आताही ते आम्ही सरकारमध्ये आलो तर या योजना बंद करू, योजना सुरू करणाऱ्यांना तुरुंगात घालू असे म्हणत आहेत. अरे सरकार काय बंद करण्यासाठी आणि स्टे लावण्यासाठी असते का? सरकारने जनतेसाठी योजना सुरू करायला हव्या, कामे करायला हवी, प्रकल्प सुरू करायला हवे, ते न करता फक्त हे बंद करू आणि ते बंद करून स्टे लाऊ, एवढेच बोलत आहेत. त्यामुळे जनता यांना नक्कीच स्टे लावेल व महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आणेल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications