Disha Salian case: दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया!; म्हणाले - 5 वर्षांपासून..
Disha Salian case Aditya Thackeray's first response : दिशा सॅलियन प्रकरण, दिशा सॅलीयन केस लेटेस्ट न्यूज. दिशा सॅलीयन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रीया, दिशा सॅलीयन केस लेटेस्ट न्यूज, आदित्य ठाकरे लटेस्ट स्टेटमेंट ऑन दिशा सॅलीयन, आदित्य ठाकरेवर दिशा सॅलीयन प्रकरणावरुन आरोप, दिशा सॅलीयन केस विधानसभा तहकूब, आदित्य ठाकरे लेटेस्ट प्रेस, आदित्य ठाकरे लेटेस्ट मराठी न्यूज
दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होत असतानाच आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्यावरील आरोपाच्या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. "गेल्या पाच वर्षांत या प्रकरणात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आला आहे. कोर्टातील गोष्ट, कोर्टात बोलू" असे वक्तव्य करत त्यांनी आरोप करणाऱ्यांना आव्हान दिले आहे.

सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून विधानसभेचे कामकाज वारंवार बंद पाडले जात असल्याच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आला आहे. कोर्टातील गोष्ट कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट म्हणजे हीच की मी वारंवार सांगितले आहे की, माझे ट्विट असेल किंवा वक्तव्य आम्ही या अधिवेशनात या सरकारला उघडं पाडलं आहे. संघानेही या सरकारला उघडं पाडले आहे. औरंगजेब हा विषय चुकीचा आहे असे संघाचे लोक म्हणाले मग भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणार का असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
माझ्यावर आरोप करुन सत्ताधारी कामकाज बंद पाडत आहे
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नेऊन कुठे ठेवला हा माझा प्रश्न आहे. महिलांचा प्रश्न असो, त्यांच्यावरील अत्याचाराचा विषय असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चालली आहे. भाजप औरंगजेबाचा मुद्दा समोर आणतेय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडत चालला आहे पण सत्ताधारी सभागृहाचे कामकाज बंद पाडत आहेत ते कशासाठी तर माझ्यावरील आरोपांवरुन.. सभागृहाचे कामकाज बंद पाडायचे तर पाडू द्या मग...सत्ताधारी पक्षातील आमदारांना काम करण्यासाठी निवडून दिले आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
पाच वर्षांपासून माझी बदनामी सुरुय..
दिशा सॅलीयन प्रकरणी कोर्टात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी हेच म्हणतो की, पाच वर्षांपासून जे हे सतत चालू आहे, कोर्टात जे व्हायचे ते होईल. मी एकच सांगेल की, पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. मी मुद्द्याचे बोलत आलो आणि तेच बोलत आलो आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले, पहिली गोष्टी म्हणजे कामाची गोष्ट करुया. आज राज्यापालांची भेट घेतली. त्यात दोन तीन महत्वाचे विषय आहेत या अधिवेशनाबद्दल त्यात रिव्हूवन मोशनवरुन सभागृहात जो गोंधळ आणि गडबड झाली त्यावरुन आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो होतो. याआधी अशा पद्धतीने सभागृह कधीही चालवले गेले नाही. विधान परिषदेचा अपमान हे सरकार आणि त्या खुर्चीवर बसलेले लोक करीत आहेत. वेळोवेळी विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो पण त्यावरुन सत्ताधारी पक्षच सभागृह बंद पाडतात त्यांच्याकडे आता काहीही विषय राहीलेले नाहीत.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा लक्ष्यवेधी असेल या सर्व विषयावर गांभिर्याने चर्चा व्हायला हवी. आम्ही सरकारचे प्रतिनिधी बोलावावे, मुख्यमंत्र्यांना बोलवावे आणि सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की, त्यांनी त्यांची उत्तरे स्वःत आणि अभ्यासपुर्ण द्यावी. विधानसभा, विधानपरिषद सुरु असताना मंत्री हजर नसतात ते त्यांनी हजर राहावे यासंबंधी राज्यपालांकडे आम्ही या गोष्टी सांगितल्या आहेत.
दिशा सालियन प्रकरणावरुन विधानसभा तहकूब
दिशा सालियनच्या प्रकरणावरून विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. तिच्या मृत्यूच्या SIT चौकशीचा अहवाल त्वरीत सादर करावा आणि सामुहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते. त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज असेल तर त्यांना अटक करावे अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यासह आरोप झालेल्या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!











Click it and Unblock the Notifications