Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'सातपुडा' बंगल्यावरील मुंडेंचा मोह सुटेना; छगन भुजबळ म्हणाले-दादांकडे नव्हे मुख्यमंत्र्यांना सांगणार

dhananjay munde satpuda bungalow controversy : राज्याच्या राजकारणात सध्या एका सरकारी बंगल्यावरून चांगलीच चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, त्यांनी अद्यापही 'सातपुडा' बंगला रिकामा केलेला नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे छगन भुजबळ या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत.

dhananjay munde satpuda bungalow

भुजबळ म्हणाले, "मी त्यांना कसं काय बाहेर काढणार?"

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, आणि मला सामान्य प्रशासन विभागाने १५ दिवसांनी पत्र देऊन 'सातपुडा' बंगला दिल्याचे कळवले," असे ते म्हणाले. मात्र, बंगला खाली नसल्यामुळे त्यांना अजूनही तिथे राहता आलेले नाही. "तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहेत. मी अजून त्यांना एक शब्दही बोललो नाही," असे सांगत भुजबळ यांनी आपण सामंजस्याची भूमिका घेतल्याचे संकेत दिले. "आता मुख्यमंत्री आणि इतर नेतेमंडळी यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही," असेही त्यांनी पुढे सांगितले.

'मी काय तक्रार करणार?'

या प्रकरणाबाबत अजित पवार किंवा इतर नेत्यांशी चर्चा केली आहे का, असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, "अजितदादांनी विचारलं, पण मी म्हटलं की, घर खाली झालं की जाईन. आमचे ते पक्षातले सहकारी आहेत. मी काय तक्रार करणार? फार-फार तर मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं एखादं छोटं मोठं घर असेल तर ते द्या."

राजीनामा आणि दंडाचे कारण

धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी त्यांच्या निकटवर्तीय असल्याच्या आरोपांनंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेला साडेचार महिने उलटूनही त्यांनी बंगला रिकामा न केल्यामुळे त्यांना दंड लावण्यात आला आहे. हा दंड आता तब्बल ४२ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणावरून सरकारी नियमांचे पालन आणि राजकीय सहकाऱ्यांमधील समन्वय यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+