धनंजय देशमुख यांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले- कृष्णा आंधळेला आश्रय का?, ग्रामस्थ संतप्त

Dhananjay Deshmukh Attack on Beed Police : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे केलेल्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. आता या प्रकरणाला दोन महिने झाले असून अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही. दरम्यान, अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी यासाठी मस्साजोग गावाच्या लोकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मस्साजोग ग्रामस्थांनी केले अन्नत्याग आंदोलन!

बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावी. अशी मागणी मस्साजोग गावाचे लोक करत आहेत. न्यायासाठी मस्साजोग गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्हाला न्याय नक्की कधी मिळणार, अशी मागणी त्यांनी केली. धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडमधील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांचा मित्र आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

Dhananjay Deshmukh

धनंजय देशमुख यांनी काय आरोप केला?

मस्साजोग गावातील लोकांनी न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्थानिक पोलीस स्टेशनने सीआयडीकडे काय तपास दिला? तो योग्य आहे का..? सीआयडी चांगल्या दिशेने तपास करत आहेत. परंतु, बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही. त्यावर आम्ही चर्चा केली धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे.

यामध्ये SP यांनी याबाबतची कुठलीही माहिती पुरवली गेली नव्हती. 6 डिसेंबर रोजी का ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही. सगळे गुन्हे दाखल झाले ते वेळ निघून गेल्यावर झाले. पोलिसांनी कृष्णा आंधळेला का आश्रय दिला होता. लोकांचे खून करण्यासाठी व अपहरण करण्यासाठी त्याला मोकळं सोडलं आहे का?, त्याला पोलिसांनी मित्र बनवलं होतं का? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

दोन दिवस अन्नत्याग आंदोलनावर आम्ही ठाम

आम्ही आंदोलनावर ठाम आहोत गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत. दोन दिवस हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर अन्नपान देखील घेणार नाहीत. सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहेत. ते कशा पद्धतीने काम करत आहेत ही माहिती आम्हाला नाही. केज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगायला हवं होतं की यापूर्वीच्या तपास कशा पद्धतीने झाला आहे असंही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+