उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल, शिंदेंवरील आरोपावरुन फटकारले!

Devendra Fadnavis on uddhav thackerey : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील एका गटाने केलेल्या बंडखोरीबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी शिवसेना कशी फुटली आणि त्यामागची खरी कारणे काय होती, यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी विशेषतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर 'खोके'च्या आरोपांवरून जोरदार पलटवार केला आहे.

Devendra Fadnavis

'खोक्यां'चा आरोप आणि फडणवीस यांचे उत्तर

शिवसेनेच्या आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर '50 खोके' घेतल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला होता. या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना नैराश्य आले आहे आणि म्हणूनच ते असे विविध प्रकारचे वक्तव्य करत आहेत.

त्यांनी प्रतिप्रश्न केला की, "उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का?" फडणवीस यांच्या मते, आमदारांनी पक्ष सोडण्यामागे पैशांचा नव्हे, तर शिवसेनेतील अंतर्गत व्यवस्था आणि कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेला असंतोष हे प्रमुख कारण होते. आमदार त्यांच्यावर हैराण झाले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात एवढी मोठी जोखीम कोणीही घेत नाही. जर कोणी खोके घेतले असतील तर त्याचे राजकीय आयुष्य संपून जाते, असे सांगत त्यांनी 'खोके'च्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, सर्व आमदार एकत्र होते आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.

शिंदे यांच्या बंडखोरीचे मूळ कारण: 'अपमान'

शिंदे यांनी अचानक बंडखोरी करण्याचा निर्णय का घेतला, यावरही फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या आमदारांना मतदान कसे करायचे यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी तत्कालीन गट नेते असलेले एकनाथ शिंदे यांना बाहेर बसवण्यात आले होते. त्यांच्या जागी एका सल्लागार व्यक्तीला आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी ठेवले होते.

हा अपमान एकनाथ शिंदे यांना सहन झाला नाही. "गटनेत्यावर इतका विश्वास नसेल तर थांबून काय करायचं?" असे सांगत फडणवीस यांनी हाच क्षण शिंदे यांच्या बंडखोरीचा निर्णायक क्षण ठरला असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळेच त्यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतरच त्यांना या निर्णयाची माहिती दिली.

'मला हलक्यात घेऊ नका' हा इशारा कोणासाठी?

अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे यांनी 'मला हलक्यात घेऊ नका' असा गर्भित इशारा अनेकदा दिला आहे. हा इशारा कोणासाठी आहे, या प्रश्नावर फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा इशारा उद्धव ठाकरे यांना उद्देशून आहे, स्वतःसाठी नाही. शिंदे अजूनही ठाकरेंना सांगत असतात की, "टांगा पलटी झाल्याचे सांगत मला हलक्यात घेऊ नका." यातून त्यांनी शिंदे यांच्या बंडखोरीची तीव्रता आणि त्यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+