कोर्टानं जामीन देतानाचा निर्णय लक्षात घ्या, मग ठरवा ते दोषी की निर्दोष - फडणवीसांचं देशमुखांना उत्तर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकालात सादर करण्यात आला आणि त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही असं ते म्हणाले.
अनिल देशमुखांना न्यायालयाने जामीन दिला. त्यावेळीचा निर्णय लक्षात घेता ते दोषी आहेत की निर्दोष आहेत हे स्पष्ट होईल असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

देशमुखांनीच वाझेंना कामावर घेतलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सादर करण्यात आला होता, त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अनिल देशमुख यांचा प्रश्न आहे, ते गृहमंत्री होते, परमवीर सिंह यांना त्यांनी सीपी केले होते, आणि त्यांनी वाझे यांनाही कामावर घेतले होते.
#WATCH | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis says, "The Chandiwal Commission report was submitted during the tenure of the Maha Vikas Aghadi, they did not take any action on it. As far as Anil Deshmukh is concerned, he was the Home Minister, he made Paramvir Singh… pic.twitter.com/8Ezmd04EWB
— ANI (@ANI) August 4, 2024
#WATCH | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis says, "The Chandiwal Commission report was submitted during the tenure of the Maha Vikas Aghadi, they did not take any action on it. As far as Anil Deshmukh is concerned, he was the Home Minister, he made Paramvir Singh… pic.twitter.com/8Ezmd04EWB
— ANI (@ANI) August 4, 2024केंद्र सरकारचा काहीच हस्तक्षेप नव्हता
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा परमवीर सिंग यांनी त्यांचे म्हणणे मांडले तेव्हा उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि उच्च न्यायालयानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले, त्यामुळे त्यात केंद्र सरकारचा काहीच हस्तक्षेप नव्हता. जेव्हा जेव्हा अनिल देशमुख जामीनासाठी न्यायालयात गेले आणि अखेरच्या वेळी त्यांना जेव्हा न्यायालयानं जामीन दिला त्यावेळीचा निर्णय पाहाल, तर ते (अनिल देशमुख) दोषी आहेत की निर्दोष हे स्पष्ट होईल."
आज काय म्हणाले होते अनिल देशमुख?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला होता. तीन वर्षांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांना जे आरोप माझ्यावर करायला लावले होते, तेच तेच आरोप काल माझ्यावर त्यांनी पुन्हा केले. या आरोपाची चौकशी झाली. मला त्या अहवालात क्लिन चिट देण्यात आली. म्हणूनच फडणवीस माझ्याविरुद्धचा चौकशी अहवाल उघड करत नाही असं देशमुख यांनी म्हटलं होतं.
फडणवीसांनी तो अहवाल उघड करावा
सचिन वाझेच्या आधारे माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करायला लावला. त्यांचा आधार देवेंद्र फडणवीस घेतात ही आश्चर्याची बाब आहे. परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर तीन वर्षांपुर्वी आरोप लावायला सांगितले, त्यानंतर माझी चौकशी झाली. मी वारंवार विनंती करुनही राज्यशासन माझ्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणत नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, हा अहवाल त्यांच्याच गृहमंत्रालयाकडे आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा. फडणवीस हा अहवाल जनतेसमोर का उघड करत नाही तो त्यांनी उघड करावा अशी मागणीही त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications