जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही तोवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरु राहील- फडणवीस
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा करुन संतोष देशमुख याना न्याय मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
वाल्मिक कराड यांनी पुणे येथे सीआयडी मुख्यालय शरणागती पत्करली . त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. संतोष देशमुख प्रकरणातील प्रत्येकावर कडक कारवाई होईल. गुंडाचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुठलाही आरोपी असला तरी आम्ही शोधून काढू. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही तोवर तपास सुरु राहील. या प्रकरणात कुणाचाही चालणार नाही. पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. पुरावा असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही. माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणे हे महत्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले .

संतोष देशमुख यांच्या बंधूशी फोनवर बोलणे झाले असून सर्व आरोपींवर कारवाई होणार असल्याचे त्याना आश्वस्थ केले आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. कोणाचाही दबाव चालणार नाही. पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. जेथे पुरावा आहे, त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणी ३०२चा गुन्हा दाखल होणार का, ते पोलीस बघतील. पुराव्यांच्या आधारे पोलीस निर्णय घेतील. सीआयडीला स्वायतत्ता दिली आहे, असेही ते म्हणाले .
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का, असा प्रश्न माध्यमांनी विचारले असता, मला राजकारणात जायचे नाही. कोणाकडे पुरावे असेल तर द्यावे, असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. तसेच, काही लोकांना राजकारण हवे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांनी राजकारण करत राहावे. आमची भूमिका स्पष्ट आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो आम्ही मिळवून देऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications