Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आरोपाला फडणवीसांचे प्रत्युत्तर, आत्मपरिक्षण करा
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : 2024 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा खेळ होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. त्या लेखामध्ये त्यांनी घोटाळ्याची पंचसूत्री मांडली. राहुल गांधींच्या या आरोपावर भाजप नेते जेपी नड्डा यांनी देखील प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्या आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात शेवटच्या तासात 18 टक्के मतदान झाले, तिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला.
वणीत शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, तिथं काँग्रेस विजयी झाली, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींनी आत्मपरिक्षण केले पाहिजे
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणारा अपमान...जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत.
यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने निवडले
काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला. 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले.
2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले. तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर 1 कोटी मतदार वाढल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 2024 मध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात.
महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
फडणवीसांचे 5 महत्त्वाचे मुद्दे
• महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित होणं आता नित्याचं झालं आहे.
• ईव्हीएम विरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
• राहुल गांधी हे पराभव स्वीकारू न शकणारे नेते आहेत, असं फडणवीस म्हणाले.
• काँग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक जिंकते, तिथे ईव्हीएम योग्य असतात का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
लेखाचे उत्तर लेखानेच देऊ
"आम्ही लेखाचं उत्तर लेखानेच देऊ. खोटं वारंवार बोलून ते खरं होत नाही. देशातील जनता सत्य ओळखते. महाराष्ट्राने वेळोवेळी भाजपला भरभरून पाठिंबा दिला आहे आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा तो स्पष्ट दिसून आला.
शेवटी राहुल गांधींना उद्देशून फडणवीस यांनी लिहिलं, "जनादेशाचा आदर करा. जनता सारं काही पाहत आहे. आता बहाणे चालणार नाहीत - उत्तरदायित्व ठरवले जाईल."
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications