काळजी करु नका, पुढच्या मार्चपर्यंत लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतच राहणार अन् नंतरही..- फडणवीस
मुंबई - लाडकी बहिण योजनेवरुन एकीकडे विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. ही योजना निवडणूक जुमला असून निवडणुकीनंतर बंद पडेल असे सांगत आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्पष्टच बोलले. पुढच्या मार्चपर्यंत (2025) लाडकी बहिण योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे त्यामुळे सर्वांनी काळजी करु नये असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपुरात जिल्हा भाजप अधिवेशन आज पार पडलं. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

नेमके काय म्हणाले फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहिण योजनेसाठी पुढच्या मार्चपर्यंतचे सर्व पैशांची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक काहीही बोलतील पण. आपण पुन्हा निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी पैसे बजेटमध्ये ठेवू. त्यांनंतरच्या बजेटमध्येही आणि त्यानंतरच्या बजेटमध्येही पैशांची तरतूद ठेवू.
🕖 6.40pm | 4-8-2024📍Nagpur | संध्या. ६.४० वा. | ४-८-२०२४📍नागपूर.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2024
LIVE | नागपूर जिल्हा भाजपा अधिवेशन@BJP4Nagpur @BJP4Maharashtra#Maharashtra #Nagpur #BJPConvention https://t.co/BKGCWhM470
लाडक्या बहिणींसाठीचा शब्द पाळणारच
देवेंद्र फडणवीस यांनी हेही स्पष्ट केलं की, लाडक्या बहिणींना जो शब्द दिला तो आपण (सरकार) पाळणारच आहे. महिलांसाठी आपल्या सरकारने जे कार्यक्रम हाती घेतले ते पुर्ण होत आहेत. एसटीत महिलांसाठी अर्धा तिकीट योजना असो की, सर्व कागदपत्रांमध्ये आईचे नाव नमूद करणे असो हे आपण करतोय.
माझा नवीन सरकारी कागद निघाला तर तो देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असा नसेल तर तो देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा असेल. खासगी काॅलेजमध्येही पाचशे सात काॅलेजसमध्ये मुलींना शैक्षणिक शुल्क लागणार नाही. मुलींचं केजी टू पीजी शिक्षण मोफत होणार आहे तो आपल्या सरकारनं निर्णय घेतला. दहा लाख तरुणांना नोकरी आणि दहा हजारांच्या पगाराची योजनाही आपण आणली आहे असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची ही कबुली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात हवा तसा निकाल लागला नाही. नागपूरातही फारसा निकाल आपल्या बाजूने नाही..राजकीय गणित आपल्याविरोधात गेलं हे खरं आहे. त्यांच्या जागा जास्त आल्या हेही खरं आहे, पण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांत फक्त पाॅइंट तीन टक्के फरक आहे. यामुळे त्यांना ३० आणि आपल्याला १७ जागा दिल्या असं फडणवीस म्हणाले. आपण मतांमध्ये बघितलं तर दोन कोटी ४८ लाख महायुतीला तर दोन कोटी ५० लाख मतं महाविकास आघाडीला आहे. आपण राजकीय गणित योग्यप्रकारे सोडवू शकलो नाही.
आपण गणितात कमी पडलो, ही कारणं
महायुतीची लढाई महाविकास आघाडीतील तीन पक्षांशी नव्हती तर एका चौथ्या पक्षाशी होती त्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटीव्ह. रोज खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारे ते खोटं बोलत राहीले. त्यांच्यावर लोकांचा विश्वासही नाही म्हणून त्यांनी काही बाजारबुनगण्यांची आणि तथाकथित विचारवंतांची टोळी तयार केली जी टोळी डाॅ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा संपली असं खोटं सांगितलं.
दुसरीकडे मुस्लीम, अल्पसंख्यांक समाजात दुसरा, शेतकऱ्यांत तिसरा नरेटीव्ह असे खोटे नरेटीव्ह त्यांनी पसरवले याचा परिणाम असा झाला की, महाविकास आघाडीपेक्षा आपल्याला काही मतं कमी मिळाली. त्यामुळे मोठं नुकसान आपलं झालं. आता काळजी करण्याचं कारण नाही आता आपण फेक नरेटीव्हला उत्तर द्यायचं असं आवाहनही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलं.












Click it and Unblock the Notifications