जब एक ही चुटकुला बार-बार… राहुल गांधींना फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर, बावनकुळेंचे ट्विटही चर्चेत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवला. मात्र त्यानंत ईव्हीएम मशिनवर आरोप सुरु झाले. ते अद्यापही होत आहेत. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीची सविस्तर आकडेवारी देत, निवडणूक आयोगाला काही प्रश्न केले. राहुल गांधींच्या या संशयकल्लोळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

मविआची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यात महायुतीने मोठा विजय मिळला. निकालानंतर विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले गेले. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विधानसभा निवडणुकींबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदारांची आकडेवारी मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका वाक्यात उत्तर देत राहुल गांधींच्या आरोपाची हवा काढली.
काय म्हणाले फडणवीस?
राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जेव्हा एकच विनोद पुन्हा पु्न्हा ऐकवला जातो तेव्हा त्यावर हसू येत नाही (जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!)," विशेष म्हणजे फडणवीस यांनी ही पोस्ट काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांना टॅग करत केली आहे.
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
बावनकुळे यांचेही उत्तर
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत. तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे".
🔸काँग्रेस नेते @RahulGandhi आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 7, 2025
रडारड आत्ताच सुरु- बावनकुळे
बावनकुळे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे," असेही बावनकुळे म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications