Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'आपले लोक फार वेडे, जिंकले तर डोक्यावर घेतात हरलो तर...'

मुंबई - आपले लोक फार वेडे आहेत की, जिंकले तर डोक्यावर घेतात हरलो तर दगड मारायला कमी करत नाहीत. असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Dcm Ajit Pawar

विधानभवनात आज विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील चार स्टार खेळाडूंचा सत्कार सोहळा आज पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत फटकेबाजी करीत क्रिकेट चाहत्यांच्या दोन्ही बाजू थेट सांगितल्या.अजित पवार म्हणाले, भारतीय संघ विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत हरेल असेच सर्वांना वाटत होते. पण चमत्कार घडेल हेही चाहत्यांना वाटत होते, तसेच झाले आणि आपण विश्वकप जिंकलो. विराट, शिवम दुबे, अक्षर पटेलने चांगली बॅटींग केली.बुमराह आणि हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाजी केली.

म्हणून हा दिवस पाहायला मिळाला...

अजित पवार म्हणाले, सूर्यकुमारने अंतिम सामन्यात अफलातून झेल घेतला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला हा स्वागत समारंभही करायला मिळाला. सुर्यकुमारचा झेल अप्रितम होता तो घेतला म्हणूनच आपण जिंकलो. काल मरीन ड्राईव्हला खेळाडूंच्या स्वागताची रॅलीतील एवढी गर्दी पहिल्यांदा बघितली.
भारतीय खेळाडूंचे क्रिकेटवरील प्रेम किती आहे हे गर्दी पाहून समजून येते.

..तेच काम सूर्यकुमार यादवने केले

अजित पवार म्हणाले, आपले लोक फार वेडे आहेत की, जिंकलो तर डोक्यावर घेतात, हरलो तर दगड मारायला कमी करत नाहीत. सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्माने विश्वात नाव कमावले. सूर्यकुमारने जे आज काम केले ते याआधी कपिल देवने केले होते. शिवम् नवखा पण चांगला खेळाडू आहे. रोहित टी-ट्वेंटी आता खेळणार नाही परंतू जेव्हाही टी -ट्वेंटी क्रिकेट बघू तेव्हा रोहित शर्माची आठवण येईल.

रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दुःख दिले - देवेंद्र फडणवीस

या सत्कार सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत भारतीय खेळाडूचा गौरव केला. फडणवीस म्हणाले, अपराजित भारतीय टीमने टी-ट्वेंटीचा विश्वकप जिंकला, त्यातील चार भारतीय खेळाडूचे स्वागत करण्याची संधी आपल्याला मिळाली. हा अभुतपूर्व क्षण आहे. रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दुःख दिले. त्या दिवशी त्याने विश्वकप दिला आणि टी-ट्वेंटीमधून निवृत्तीही घेतली. कपिल देव आणि धोनीनंतर विश्वकप जिंकून देणारे रोहित शर्मा आहे.

कमीत कमी बोलून आपल्या बाॅडीलँग्वेजने उत्तर देता येते हे त्याच्याकडे पाहून दिसते. सर्वाधिक धावा, रन, पार्टनरशीप, विजय हे विक्रम रोहित शर्मा यांनी ट्वि-ट्वेंटीमध्ये केला आहे.

रोहितने चार चाँद लगावले..

फडणवीस म्हणाले, रोहितकडे विश्वास आणि समर्पण आहे. कठोर वागून देखील संघाच्या खेळाडूचा विश्वास कमी होऊ न देणारा रोहित शर्मा आहे. एक उत्तम कर्णधारात रोहित शर्मा असून त्याने चार चाँद लगावले.बाॅलरला रात्री झोप येणार नाही अशी रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादवची बॅटींग आहे. सूर्यकुमारने पकडलेला झेल अविश्वसनीय होता. शिवम दुबेच्या बॅटची चलती असून यशस्वी जैस्वालच्या खेळीतून सुनील गावस्कराच्या बॅटींगची आठवण होते. या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंनी देशाला गौरव प्राप्त करुन दिला. राजकारणातही क्रिकेटसारखी स्पर्धा असल्याचेही फडणवीस म्हणाले

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+