ही दुर्घटना..यातून काहीतरी चांगलं घडावं म्हणून.! शिवरायांच्या पुतळ्याबाबत केसरकरांचं वक्तव्य चर्चेत
काही चांगलं घडायसाठी वाईट घडतं असं म्हणत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मालवण येथे असणाऱ्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. याठिकाणी आधीपेक्षा मोठा 100 फूट उंच पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी पुतळा परिसराची पाहणीही केली.
सिंधुदुर्गमधील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. नौदलाकडून उभारण्यात आलेल्या या पुतळा्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षीच डिसेंबरमध्ये अनावरण झाले. मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसलळ्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त होत आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?
दिपक केसरकर म्हणाले, हा एक अपघात आहे हा पुतळा नदराने उभारला होता तो नौदलाचा दिवस होता पंतप्रधान इथे येणार होते त्यामुळे त्यावेळी हे काम झपाट्याने करण्यात आले आणि सर्वांनी त्याचं कौतुक केलं मला वाटते ही एक संधी आहे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला तर संपूर्ण भारतातील पर्यटकांसाठी ते आकर्षक ठरेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखी उभारली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली ठरेल
शंभर फुटाचा पुतळा उभा केल्यास अभिमान
केसरकर म्हणाले, "मालवण येथील पुतळा नौदलाने स्थापन केला होता. सदर पुतळा कोसळला हे दुर्दैवी आहेच, पण यातून काही चांगल्या बाबी घडू शकतात. या पुतळ्याची उंची 28 फूट होती. मात्र येथील लोकांनी 100 फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर 100 फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल.
केसरकर म्हणाले, "मालवणचा दौरा केल्यानंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. आमच्याकडे मोठ्या पुतळ्याचे एस्टिमेट तयार आहे. मुंबईत आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारत आहोत. त्यामुळे तेवढा मोठा नाही, मात्र राजकोट किल्ल्यावर बसू शकेल एवढा मोठा पुतळा नक्कीच याठिकाणी उभारू. मी सिंधुदुर्गचा रहिवासी आहे. नौदलाने पुतळा उभारल्यामुळे आम्ही काही म्हणालो नव्हतो. पण व्यक्तिशः मला हा पुतळा लहान वाटला होता. त्यामुळे आता मोठा पुतळा उभारला गेला पाहिजे", अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली
मला दुःख होतयं..
केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की हे एक दुर्घटना असले तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं हे असावं.भारतातले छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिलं आरमार उभारले होते म्हणून त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ नेव्हीनेही आपल्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपतींचं बौधवाक्य त्या ठिकाणी घेतलेला आहे, हा या महाराष्ट्राच्या भूमीचा फार मोठा सन्मान आहे.












Click it and Unblock the Notifications