Cyclone shakthi : 48 तास अति महत्त्वाचे! 'शक्ती' चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
Cyclone shakthi maharashtra high alert mumbai : अरबी समुद्रात निर्माण झालेले 'शक्ती' चक्रीवादळ (Cyclone Shakthi) महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असून, राज्य प्रशासनाने आणि नागरिकांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत चक्रीवादळाचा धोका असल्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर अति जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्राचे मोठे संकट आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना संभाव्य धोकादायक वादळासाठी सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शक्ती वादळ वेगाने सरकत असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडू शकतो तसा आयएमडीकडून इशारा देण्यात आला आहे.
किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्याचा धोका
उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ४५-५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, जी ६५ किमी प्रतितास वेगापर्यंत वाढू शकते. 'शक्ती' चक्रीवादळ अधिक तीव्र झाल्यास वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
कोळी बांधवांना इशारा: मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आणि किनाऱ्यावरच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्री लाटांचा धोका: किनारपट्टीवरील अधिकाऱ्यांनी समुद्र लाटा (स्टॉर्म सर्ज) आणि समुद्राचे पाणी आत घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन, सखल भागातील समुदायांसाठी सतर्कता बाळगली आहे.
विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
या वादळामुळे केवळ किनारपट्टीच नाही, तर राज्याच्या अंतर्गत भागांनाही पावसाचा मोठा धोका आहे.
पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार ते अति जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
उत्तर कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे शहरी भागात पूर येण्याचा आणि जलमय होण्याची भीती आहे.
#WATCH | Morning visuals from the Marine Drive in Mumbai as people go about their day.
— ANI (@ANI) October 5, 2025
IMD forecasts that Mumbai will experience scattered light rain until October 8 as Cyclone Shakti is expected to reach the northwestern and central parts of the Arabian Sea, impacting the… pic.twitter.com/xNeWnHwVTN
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
'शक्ती' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व जिल्हा प्रशासनांना तातडीने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली (Disaster Management System) सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- तयारीचे प्रमुख मुद्दे
- किनारपट्टी आणि पूरप्रवण भागातून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे नियोजन.
- प्रवासासंबंधी, सुरक्षित निवारा आणि सुरक्षेच्या नियमांविषयी सार्वजनिक सूचना जारी.
- आपत्कालीन सेवा आणि मदत सामग्रीची तयारी पूर्ण.
- जलाशये आणि पाण्याची पातळी यांचे सतत निरीक्षण सुरू.
नागरिकांना समुद्रकिनारे, नद्या किंवा अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपत्कालीन पथके कोकण किनारपट्टीवर हाय अलर्टवर असून, निसर्गाच्या या रौद्र शक्तीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सज्ज झाले आहे.
हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधगिरी बाळगा! तुफान पाऊस, अनेक ठिकाणी साचले तळे, अजून जोरदार कोसळणार
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications