मोठी बातमी..! बदलापूर प्रकरणात पोलिसांना ठरवलं दोषी; न्यायालयाचा मोठा निर्णय
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर प्रकरण चांगलंच गाजलं होतं. आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना या प्रकरणात दोषी ठरवत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

काय म्हणाले न्यायालय?
न्यायाधीश रेवती मोहिते व न्यायाधिश नीला गोखले यांनी आज मॅजिस्टेटच्या अहवालाचा आढावा घेतला. त्यात ही बनावट चकमक असल्याचे समोर आले. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, हे पोलिसांचं म्हणणं पटणार नाही, ते संशयास्पद आहे, असं न्यायालयीन चौकशी अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदेच्या वतीने कोर्टात लढणाऱ्या वकीलांनी सांगितलं की, ही चकमक बनावट आहे, हे आमचं म्हणणं होतं. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी आमची मागणी होती.
काय होते प्रकरण?
बदलापूरच्या शाळेच शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर एका दुसऱ्या गुन्ह्यात तळोदा कारागृहातून दुसऱ्या तुरुंगात नेत असताना हा एनकाउंटर झाला. अक्षयने पोलिस व्हॅनमध्ये पोलिसांची बंदुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने एका पोलिसाला जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र या प्रकरणाचा चौकशी अहवाल ठाण्यातील मॅजिस्टेटने बंद लिफाफ्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.
कुणावर ठेवला ठपका?
संजय शिंदे (पीआय), निलेश मोरे (उपनिरीक्षक), हरिश तावडे (हवालदार), अभिजीत मोरे (हवालदार) या पोलिसांवर न्यायालयाने ठपका ठेवला. या सर्वांची आता चौकशी होणार आहे. दरम्यान, बदलापूरमधील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घटनेनंतर बदलापूरात चांगलाच आक्रोश पहायला मिळाला होता. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. रेल रोको आंदोलनही करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications