Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र कणखर राहीला का? लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार? - CM फडणवीसांनी दिले 'हे' उत्तर! वाचा

CM Fadnavis : महाराष्ट्र कणखर राहीला का? या सामनातुन विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी "काहीतरी ठेवा..कुठला दिवस, कुणाबद्दल विचारता" असे म्हणत CM देवेंद्र फडणवीसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला. यासह लाडक्या बहणींच्या हप्त्यावर चुप्पी साधली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र दिनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

CM Fadnavis  silence on installments of ladki Bahin yojana

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र दिन यासाठी महत्वाचा आहे की, या भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतीशिल राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासात भूमिका पार पाडतो आहे, याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे.

ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्थेचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,महाराष्ट्राला असेच सातत्याने पुढे न्यायचे आणि ट्रिलीयन डाॅलर अर्थसंकल्प करण्याचा आमचा संकल्प आहे, शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार आणि निश्चय आम्ही केला आहे.

लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर टाळले

लाडक्या बहि‍णींचा हप्ता कधी येणार? यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. ते म्हणाले, जो शंभर दिवसांचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येत आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सर्वांपर्यंत पोहचवा.

सामनातील लेखावर दिली प्रतिक्रीया

पुर्वीचा महाराष्ट्र कणखर राहीला का? यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोकदार प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, काहीतरी ठेवा, कुठला तरी दिवस आणि कुणाबद्दल विचारताय...? असा उलट सवाल त्यांनी केला.

भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगती होवो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी महाराष्ट्र दिनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : Devendra Fadnavis : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले- आम्हाला काही फरक पडत नाही

हेही वाचा : Devendra Fadnavis Net Worth: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे इतकी कोटींची संपत्ती ,घ्या जाणून

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+