Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Devendra Fadnavis Net Worth: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे इतकी कोटींची संपत्ती ,घ्या जाणून

Devendra Fadnavis Net Worth: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीला विधानसभा निवडणूकीत 234 जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपाने 132 जागांवर विजय मिळाला आहे. तर शिवसेनेला 57 जागा तर राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला आहे. उद्या म्हणजेच 25 नोव्हेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या या मोठ्या विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी तीन ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं जावं, असं भाजप कार्यकर्ते, आमदार आणि संघाच्या नेत्याची सुध्दया इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्याने आपल्या मालमत्तेचाही उल्लेख केला आहे.

devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक

प्रतिज्ञापत्रानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपयांची चल-अचल मालमत्ता आहे. 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79,30,402 रुपये होते. तर 2022-23 मध्ये ते 92,48,094 रुपये होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर 56 लाख 07 हजार 867 रुपये आहेत तर पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 6,96,92,748 रुपये आणि त्यांच्या मुलीच्या नावावर 10,22,113 रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली होती.

या ठिकाणी केलीय मोठी गुंतवणूक

या प्रतिज्ञापत्रानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चंद्रपूरमध्ये शेतजमीन, धरमपेठ, नागपूर येथे निवासी इमारत आणि इतर अनेक मालमत्ता आहेत. याशिवाय 32 लाख 85 हजार रुपये किमतीचे 450 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या एफडी आणि बचत बँक खात्यात 2,28,760 रुपये आहेत. टपाल बचत, विमा पॉलिसी आणि आर्थिक साधनांमध्ये 20,70,607 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+