लाडक्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना! वाचा काय म्हणाले CM एकनाथ शिंदे
CM Baliraja free electricity scheme : राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ इथं केली.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या.

शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे. या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही, त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिण्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे.
योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.
राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिण्याला 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,
कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ. प्रा. डॉ.अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. नामदेव ससाणे, आ. इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.
तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.












Click it and Unblock the Notifications