Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहिण, भाऊ योजनेवरील विरोधकांच्या टीकेला सीएम एकनाथ शिंदेंनी दिले 'हे' सडेतोड उत्तर! वाचा

हिंगोली - लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार टीका करत आहेत. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं असून या योजनांचा आणि निवडणुकीशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Scheme to uplift the standard of living of the people

ही योजना जनलाभासाठी..

राज्य शासनातर्फे सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. या योजना लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केल्या आहेत .निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनांची घोषणा केली नाहीत. या कायमस्वरूपी चालणाऱ्या जनलाभाच्या योजना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्‍यांचा कावड यात्रेत सहभाग

कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील महादेव मंदिर पर्यंत तब्बल 18 किलोमीटर ही कावड यात्रा पार पडली. बम बम भोले च्या गजरात हजारो शिवभक्तांनी कावड यात्रेत सहभाग घेतला.आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आज हिंगोलीत पार पडली. कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा हिंगोलीत पोहोचली. या यात्रेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

हिंगोलीत सीएम एकनाथ शिंदेंची सभा

हिंगोली येथे जाहीर सभा पार पडली . यावेळी आमदार बालाजी कल्याणकर , आमदार संतोष बांगर , माजी खासदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लाखों शिवभक्तांचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता . याप्रसंगी बोलताना विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सर्वसामान्यांचे हितासाठीचे निर्णय हे सरकार घेत राहील

हिंदुत्व काय हे दाखवून दिलं

लाडकी बहिण योजना , लाडका भाऊ योजना यासारख्या सर्वसामान्यांना लाभ देणाऱ्या योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत तर त्या कायमस्वरूपी चालणाऱ्या योजना असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. कळमनुरी तालुक्यातील होणाऱ्या विपश्यना केंद्राला निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्याची मान्यता लवकरच देणार असे आश्वासनही त्यांनी जाहीर भाषणात दिले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

बम बम भोले च्या गजरात शिवभक्तांनी 18 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतरही उत्साह कायम टिकून राहिल्याबद्दल अभिनंदन करत खरे हिंदुत्व काय हे दाखवून दिलाचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+