छगन भूजळबळांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आक्रमक होत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भूजबळ यांनी पुण्यात केलेल्या भाषणातून चिथावणी दिली आहे. आता गंजल्यात तलवारी. त्या घासून ठेवा, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळांचा हा इशारा गंभीर आहे.

त्यांनी शायरीच्या माध्यामतून बोलू किंवा कश्याच्या माध्यमातून बोलू. याचा अर्थ त्यांना मराठा समाजासोबत दंगल घडवून आणायची आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील...
भुजबळांनी कितीही चिथावणी दिली तरी आपण काही करायचं नाही. शांततेत राहायचं. पण तयारीत राहा. त्याने हत्यारे वाटलं तर आपण हातबांधून राहायचं नाही. आपला एकही बळी जाता कामा नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
"छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलणारी माणसं पेरली आहेत. त्यांना दंगल घडवायची आहे. भुजबळांच्या पुण्याच्या भाषणातून अनेक अर्थ निघत आहेत. ते चिथावणी देत आहेत. लोकांना दंगलीसाठी तयार करत आहेत. तसा प्रयत्न झाला तर आपण तयार राहावं. तसा प्रयोग झाला तर आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझं सांगणं आहे, या गोष्टींकडे गांभीर्याने पाहा. भुजबळ इशारे देत असेल तर राज्यासाठी गंभीर बाब आहे. राज्यासाठी शांततेची बाब नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. कडवट मराठे आहोत. उत्तराला उत्तर देणारच, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
13 तारखेपर्यंत शांत रहा
मंत्री शंभुराज देसाई यांनी आम्हाला 13 तारखेपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या शब्दांचा मान राखतो. ते म्हणतात म्हणून मी 13 तारखेपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही. बोलणार नाही. ही माझी शेवटची प्रतिक्रिया आहे. 13 तारखेला आमच्या 9 मागण्या मान्य होतील ही अपेक्षा ठेवू.
शंभुराज देसाई यांनी शांत राहा म्हटलंय, याचा अर्थ सरकार आपल्या बाजूने सकारात्मक आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता भुजबळ यांनी त्यांच्या लोकांनी काहीही म्हटलं तरी 13 तारखेपर्यंत काही उत्तर देऊ नका. आपल्याला मारहाण केली तरी उत्तर देऊ नका. 14 तारखेला काय करायचं ते पाहू, असं विधान जरांगे यांनी केलं आहे.
विखे पाटलांच्या टिकेला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर केली होती. त्यावर आज मनोज जरांगेंनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे म्हणाले, आंदोलन भरकटले नाही.मराठा समाज हा 1984 पासून कुणबीत आहे.
महाराष्ट्रातला सर्व मराठा हा कुणबी आहे. हेच गेल्या 10 वर्षापासून मी सांगत आहे.कधीतरी जातीकडून बोलायला शिका. तुमच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. कधीतरी मराठ्यांच्या लेकरांसाठी बोलायला शिका.खरे बोलायला शिका.मराठ्यांवर काय वेळ आली आहे. तुमच्या आसपासचे ओबीसींचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागले.
तुमच्या नगर जिल्ह्यातले ओबीसीचे आमदार इकडे येऊन ओरडत आहे ते नाही भरकटलेले दिसत नाहीय मी कायद्याला धरून बोलतो मात्र हे आंदोलन भरकटले म्हणतात.मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल. लवकर शहाणे व्हा.












Click it and Unblock the Notifications