बड्या लोकांसाठी आणि गरीबांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का? नागपूर हिट रन प्रकरणावरुन संजय राऊत संतापले
Sanjay Raut on Nagpur hit add run : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या भरधाव ऑडीने एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये नव्हता, असे सांगितले जात आहे पण आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, नागपूर मधील हिट ॅन रन प्रकरणात अनेक बाबी लपविण्यात आल्या असून पुरावे नष्ट करण्यात आले आहेत, राज्यात हिट अॅंड रन केसेस वाढत आहेत. राज्यात दोन कायदे आहेत का? असा सवालही त्यांनी केला, राऊत म्हणाले की, ती कार कुणाची होती गाडी कोण चालवत होते, नंतर ड्रायव्हरची अदलाबदली झाली आरटीओ आॅफिसमध्ये नंबरप्लेट का बदलली जर बावनुकळे आणि त्यांच्या कुटुंबाचा एक्सीडेंटशी संबंध नाही तर ही चोरी का केली. गाडी चालवणारे शहजादे मद्यधुंद होते. त्यांना वाचवले गेले आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही गायब करण्यात आले आहे, हे सगळे प्रकरण समोर आल्यानंतर लक्षात येते की कायदा व्यवस्था किती उध्वस्त झाली आहे.

...तर फडणवीसांच्या फौजने हल्ले केले असते
राऊत यांनी सांगितले की, खासकरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूरमध्ये हे समोर आले आहे. दुस-या एखाद्या विरोधी पक्षाचा नेत्याचा मुलगा असता तर फडणवीसाच्या फौजेने त्यांच्यावर किती हल्लाबोल केला असता? पण तुमच्या प्रदेशाध्यक्षाचा मुलगा कार मध्ये होता नशेत होता हे रेकाॅर्डवर आहे. तो गाडी चालवत होता दोन लोक गंभीर जखमी आहेत. आणि त्याचे एफआयआरमध्ये नावदेखील नाही. जर गाडी बावनकुळेंची आहे, ती मुलगा चालवत होता पण सगळे पुरावे नष्ट केले. तुम्हाला कायद्याचे नाव घेऊन विरोधकांना धमकी देण्याचा अधिकार आहे का? देवेंद्र फडणवीस त्या पदावर बसायला लायक नाहीत. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आणि रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत तोपर्यंत कोणत्याही गुन्हाचा क्लिअर तपास होणार नाही. कायदा त्यांच्या इशा-यावर नाचतोय. गरीबांना वेगळा न्याय आणि तुमच्या मोठ्या नेत्यांना वेगळा न्याय. राज्यात दोन कायदे आहेत का? आम्हाला अटक करणार अन् तुम्ही लोकांना चिरडून मोकाट सुटणार हा कोणता न्याय आहे.
एमआयएमचा प्रस्ताव आला तर चर्चा करु
एमआयएमचा महाविकास आघाडीत सामिल होण्यास उत्सुक असण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की या प्रकारचा कोणताही प्रस्ताव नाही किंवा आमची बातचीत झालेली नाही. जर प्रस्ताव समोर आला तर महाविकासआघाडी चर्चा करेल.असंही राऊत यांनी सांगितले.
तर मोहन भागवतांचे पाय धरले असते
संजय राऊत म्हणाले की, मोहन भागवत आता बरोबर बोलत आहेत पण जेव्हा या देशात खाण्यावरुन आणि राहण्यावरुन माॅब लिचिंग सुरु होते. तेव्हा जर भागवत बोलले असते तर आम्ही त्यांच्या पाय धरले असते, त्यांचा गौरव केला असता.
शिवराय आमचे दैवत
शिवरायांची समाधी शोधली या वादात पडणे योग्य नाही. शिवराय आमचे दैवत आहे त्यांचे स्मरण केले पाहिजे, समाधी रायगडावर आहे, तिची निगा आपण राखली पाहिजे. असंही राऊत यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications