शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करू नये- भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार
maharashtra assembly election 2024 : पराभव झाला तर तो स्वीकारला पाहिजे. विधानसभेत लोकांनी नाकारलं. हे समजून घेण्याची गरज आहे. परंतु, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पुन्हा काही तरी करता यावं म्हणून शरद पवार हे चुकीची माहिती पसरवत आहेत. किमान या वयात तरी शरद पवारांनी खोटं बोलू नये, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
मारकडवाडी या गावातील लोकांना भेटण्यासाठी शरद पवार हे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. मारकडवाडीतील लोकांनी पुन्हा मतदान व्हावे, अशी मागणी केली. परंतु, या गावातील लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून दमदाटी सुरू आहे. त्यामुळे या गावातील लोकांना भेटण्यासाठी स्वत: शरद पवार रविवारी दाखल झाले. या घटनेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त करत पवारांवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मारकडवाडीत आलेले लोक हे जनता कुठे आहेत, ते तर त्यांचे कार्यकर्ते आहेत. ईव्हीएमवर शंका उपस्थित आजच का केली जात आहे. या आधी ईव्हीएम निवडणुका झाल्या नाहीत का, मुळात लोकसभेत ईव्हीएमवर निवडणूका झाल्या आहेत. तेव्हा आम्ही पराभूत झालो. परंतु आम्ही ईव्हीएम शंका उपस्थित केली नाही. आताच का ईव्हीएम शंका उपस्थित केली जात आहे. मुळात पराभव स्वीकारला पाहिजे, या वयात खोटारडेपणा व खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये. शरद पवारांचा आम्ही सन्मान करतो. पण अशी जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही.
LIVE |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद (08/12/2024
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 8, 2024
https://t.co/cE3NiVkFja
बावनकुळे म्हणाले की, आपला पराभव झाला हे मान्य करणे योग्य वाटत नसल्याने जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्रामघ्ये ईव्हीएम मशीनवर दोष लवपून पवार साहेब अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे. महाराष्ट्राला विकास हवा आहे, जो महायुतीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला मिळालेला आहे. निवडणुकीमध्ये लोकसभेचे 31 खासदार निवडून आले आहेत, तर त्यांनी आता राजीनामे दिले पाहिजे, त्यावर पुन्हा निवडणूका घेतल्या पाहिजेत अशी मागणी आमही करायची का, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications