Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भीषण अपघाताने बुलढाणा हादरला; भरधाव कार झाडावर आदळली; 3 तरुणांचा अंत, 2 गंभीर जखमी

Buldhana Accident News : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, मलकापूरजवळ एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या भीषण धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Buldhana Accident News

नियंत्रण सुटले आणि काळ आला...

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर धुपेश्वर ते मलकापूर दरम्यान घडला. धुपेश्वरहून मलकापूरच्या दिशेने जाणारी कार अत्यंत वेगात होती. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला.

मृतांची ओळख आणि जखमींची प्रकृती

या अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले होते. रुद्र उमेश पवार आणि विनायक जनार्दन अत्तरकर हे जागीच ठार झाले. तर प्रशांत राजू वडारे, गणेश दीपक इंगळे आणि तक्ष धुरंधर हे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गणेश दीपक इंगळे या तरुणानेही प्राण सोडले. त्यामुळे या अपघातातील एकूण मृतांचा आकडा आता तीन झाला आहे. उर्वरित दोघांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिवेग ठरला जीवावर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात, कारचा अतिवेग हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. महामार्गावर धावताना वेगावर मर्यादा न राखल्याने हा घात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

जालना: कारमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले

एका बाजूला अपघाताची घटना ताजी असतानाच, जालना जिल्ह्यातून एका थरारक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. शहरातील अंबड चौफुली येथे एका कारमध्ये व्यावसायिक सागर धानोरे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

आत्महत्या नव्हे, तर खून!

सुरुवातीला मृतदेहाजवळ पिस्तूल आढळल्याने ही आत्महत्येची घटना असावी, असा कयास लावला जात होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, हा पैशांच्या वादातून केलेला खून असल्याचे उघड झाले.

आरोपीला टोलनाक्यावरून अटक

तपासात असे समोर आले की, व्यावसायिकाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीला जालना जवळील टोलनाक्यावरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या यशस्वी तपासामुळे जालना पोलिसांनी एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+