Budget 2024 : बिहार, 'आंध्र'साठी मोदी सरकारने खजिना उघडला महाराष्ट्राच्या झोळीत टाकली निराशा!
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी एनडीएमधील मित्र पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशसाठी भरभरून दिली.
या राज्यासाठी केंद्र सरकारने खजिना उघडला. पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही फक्त आणि फक्त निराशच टाकल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून दिसून आले आहे.

केंद्र सरकारमधील मित्रांची काळजी
आज निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी युवा, महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी भरभरुन दिले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने मित्रांची काळजी घेतल्याचे दिसून येते आहे. शिवाय या अर्थसंकल्पातून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे महत्वही अधोरेखित झाले आहे. अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशसह बिहारला मोठा निधी देण्याची घोषणा केली आहे. शिवाय वेगवेगळ्या योजनाही या दोन राज्यात राबवल्या जाणार आहेत.
'आंध्र'ला १५ हजार कोटींचा विशेष निधी
- आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केल्या.
- आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
- आंध्र प्रदेशची राजधानीच्या विकासासाठीही मोठा निधी दिला जाईल
- आंध्र प्रदेशला या अर्थ संकल्पात विशेष महत्व दिले गेले आहे.
- आंध्रमध्ये रस्त्यांचे जाळेही उभारले जाणार.
- पुरनियंत्रणासाठीही आंध्र प्रदेशला निधी दिला जाणार.
- विशाखापट्टणम ते चेन्नई असा या कॉरिडोअर होणार
- पंतप्रधान गृह योजनेसाठी आंध्रला 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
बिहारसाठी तिजोरी उघडली
- बिहारसाठीही मोठ्या घोषणा या अर्थ संकल्पात करण्यात आल्या आहेत.
- बिहारमध्ये नवीन विमानतळ, क्रिडांगण, रूग्णालय उभारण्याची घोषणा.
- कौशल्य विकास केंद्र बिहारमध्ये उभारणार.
- बिहारमधील रस्त्यांसाठी 26 हजार कोटी रुपयांचा निधी देणार
- बिहारमध्ये नवा पॉवर प्रोजेक्ट उभारला जाईल.
- पूर नियंत्रणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
- पर्यटनात गया इथल्या मंदिरांचा विकास केला जाणार.
- नालंदा विद्यापीठाला पर्यटन केंद्र बनवले जाईल.
- बिहारमध्ये महाबोधी काॅरीडोअर बनवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या पदरात काय?
एकीकडे आंध्र प्रदेश, बिहार, ओडीशा या राज्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जात होत्या. त्याच वेळी महाराष्ट्राच्या पदरात मात्र काहीच पडले नसल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचा किंवा मुंबईच उल्लेख अर्थसंकल्पात नव्हता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली आहे. केंद्राने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेशाच्या विकासासाठी या योजनेची घोषणा केली. याअंतर्गत मनुष्यबळ विकास, मूलभूत विकासावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
महाराष्ट्राच्या वाटेला ठेंगा! - विजय वडेट्टीवार
अर्थसंकल्पावरुन काँग्रेसचे नेत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा! देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा सवाल त्यांनी केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 23, 2024
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय…
महाराष्ट्राला हे हवं होतं?
- महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी विशेष पॅकेज हवे होते.
- महाराष्ट्रातील रेल्वेविकासासाठी भरभरुन निधीची गरज होती.
- मुंबईल लोकलचा प्रश्न, पावसानंतरच्या उपाययोजनेसाठी निधीची गरज होती.
- शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्य निधीची तरतूद आवश्यक होती.
- पर्यटन विकासासाठी छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्याच्या विकासाला निधी हवा होता.
- समृद्धीसारखेच अन्य महामार्गासाठी पॅकेजची गरज होती.












Click it and Unblock the Notifications