Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर! भाजप-शिंदे गटातील 'गट नोंदणी'चा पेच; आता फेब्रुवारीत होणार फैसला

Mumbai Mayor Election Postponed to February : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर निवडणुकीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. ३१ जानेवारी रोजी होणारी ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली असून, ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची 'गट नोंदणी' अद्याप पूर्ण न झाल्याने ही प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव थांबवण्यात आली आहे.

Mumbai Mayor Election Postponed to February

निवडणुकीला ब्रेक का लागला?

आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी पूर्ण झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी ही प्रक्रिया थांबवण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नगरसेवकांची अपूर्ण गट नोंदणी. जोपर्यंत नगरसेवकांची गट म्हणून अधिकृत नोंदणी होत नाही आणि त्याची प्रमाणपत्रे नगरसचिव कार्यालयात सादर केली जात नाहीत, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे नेणे असंवैधानिक ठरते. ही कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : महापालिकेनंतर आता जि. प. व पं.स.तही महायुतीचा 'बिनविरोध' डंका

विरोधी गटांची तयारी, पण तांत्रिक अडचण कायम

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या एकूण ६५ नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांचे प्रमाणपत्र अद्याप नगरसचिव कार्यालयात अधिकृतपणे सादर केलेले नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचाही पेच कायम आहे.

हे ही वाचा : प्रस्तावाची गरज नाही, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार'

भाजप-शिंदे गटाची रणनीती काय?

राजकीय वर्तुळात सध्या सर्वात मोठी चर्चा ही आहे की, भाजप आणि शिंदे गट बीएमसीमध्ये संयुक्त गट (Alliance Block) म्हणून नोंदणी करणार की स्वतंत्रपणे? जर या दोन पक्षांनी स्वतंत्र गट नोंदणी केली, तर महापौर निवडीच्या वेळी व्हिप (Whip) बजावण्यावरून तांत्रिक अडचणी येऊ शकतात. या रणनीतीवरील सस्पेन्समुळेच मुंबईच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

2017 ते 2026 : मुंबईच्या राजकारणाचा बदललेला चेहरा

२०१७ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली होती, ज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, 2026 च्या निवडणुकांनी मुंबईच्या राजकारणातील गेल्या तीन दशकांचे वर्चस्व मोडीत काढले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आणि बदललेल्या समीकरणानंतर मुंबईकर मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! फडणवीसांकडून गुंतवणुकीचा 'महाखजिना' हस्तगत

बीएमसी 2026 : जागांचे नवीन गणित

२०२६ च्या निकालांनुसार मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

  • पक्ष : जागा
  • भारतीय जनता पक्ष : (BJP) ८९
  • शिवसेना (यूबीटी - उद्धव ठाकरे) :६५
  • शिवसेना (शिंदे गट) : २९
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : २४
  • एआयएमआयएम (AIMIM) : ०८
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) : ०६
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ०३
  • समाजवादी पक्ष : ०२
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ०१

निकालाचा 'किंगमेकर' कोण ठरणार?

भाजपकडे ८९ जागा असून त्यांना महापौरपदासाठी ११४ चा आकडा गाठायचा आहे. यासाठी त्यांना शिंदे गट (२९) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची साथ अनिवार्य आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गट (65) काय चमत्कार घडवणार की मनसे आणि काँग्रेसच्या मदतीने नवी समीकरणे जुळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+