महापालिकेनंतर आता जि. प. व पं.स.तही महायुतीचा 'बिनविरोध' डंका; जाणून घ्या कुठे भाजपची सरशी?

Mahayuti unopposed win pattern : राज्याच्या राजकारणात 'बिनविरोध' निवडीचा नवा पायंडा पाडणाऱ्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपला करिष्मा दाखवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा 'बिनविरोध पॅटर्न' जोरात असून, तब्बल ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, या ११ पैकी १० उमेदवार एकट्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) असून १ उमेदवार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा आहे.

Mahayuti   s Unopposed Win Pattern Dominates ZP Polls

रवींद्र चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भाजपची सरशी

सिंधुदुर्ग हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा गृहजिल्हा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत विरोधकांना सुरुवातीलाच धोबीपछाड दिली आहे. जिल्हा परिषद गटातून ५ आणि पंचायत समिती गणातून ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचे खाते उघडले असून विरोधकांनी अनेक ठिकाणी नांग्या टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद: ५ जागांचे समीकरण

जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागांवर भाजपचा विजय झाला असून १ जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे.

  • विभाग/गट : विजयी उमेदवार पक्ष
  • १. खारेपाटण प्राची इस्वलकर भाजप
  • २. जानवली रुहिता राजेश तांबे शिवसेना (शिंदे गट)
  • ३. पडेल (देवगड) सुयोगी रवींद्र घाडी भाजप
  • ४. बापर्डे (देवगड) अवनी अमोल तेली भाजप
  • ५. बांदा प्रमोद कामत भाजप

पंचायत समिती: ६ ही जागांवर भाजपचा 'क्लीन स्वीप'

पंचायत समिती गणांच्या बाबतीत भाजपने सर्वच्या सर्व ६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

१. कणकवली तालुका:

बिडवाडी: संजना संतोष राणे (भाजप)

वरवडे: राजेश (सोनू) सावंत (भाजप)

२. देवगड तालुका:

पेल: अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)

नाडण: गणेश सदाशिव राणे (भाजप)

बापर्डे: संजना संजय लाड (भाजप)

३. वैभववाडी तालुका:

कोकिसरे: सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप)

विरोधकांची माघार अन् रणनीती

अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मात्र, त्याआधीच महायुतीच्या प्रभावी नियोजनामुळे आणि स्थानिक समीकरणांमुळे अपक्ष तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा पातळीवरही महायुतीने आपली पकड मजबूत केल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+