संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी भाजपचा मेगा प्लान! भावांतर योजना आणणार..एका क्लिकवर समजून घ्या जाहीरनामा
BJP's mega plan for farmers : भाजपने आज जाहीरनामा प्रसिद्ध करत शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना आणणार असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी भाजपकडून 'भावांतर योजने'ची घोषणा करण्यात आली आहे.
कापूस सोयाबीनचे भाव पडल्यावर भावांतर योजनेतून पैसे दिले आहेत. एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजन राबविण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यानंतर अमित शहा यांनी आपले भाषण करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

अमित शहांचे उद्धव टाकरेंवर टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी कुणासोबत बसावं असं म्हणत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. महाविकास आघाडीची सर्व योजना सत्तेच्या लालसेपोटी आहे, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.
महिला सन्मानासाठी प्रयत्न - शहा
अमित शहा म्हणाले, संकल्पपत्रचे प्रकाशित झाले ते राज्याच्या भूमीतील आकांशाचे प्रतिक आहे. देशाचे नेतृत्व करत आहे, भक्ती आंदोलनाची सुरुवात राज्यातून झाली. गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आंदोलन इथूनच सुरु झाले. महायुतीची सरकार चालत आहे, यात शेतकरी आणि गरीबांचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. मला आनंद आहे, आंबेडकर यांच्या भूमीवर असताना काश्मीरमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ आंबेडकर यांनी केलेल्या संविधानाने झाला, असं अमित शाह यांनी सांगितले. सुरक्षित महाराष्ट्र कसा असायला हवी याची योजना असायला हवी.
भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
- लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये
- शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना
- प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन
- वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता 2100 रुपये करणार
- 25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
- विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार
- 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
- गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार
- फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल
- एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी
- शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न
- 2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न
- महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
- महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार
- 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असेल
- युवात फिटनेस असला पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार
- गडकिल्लांसाठी प्राधिकरण तयार करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण करणार












Click it and Unblock the Notifications