यशश्रीचा मारेकरी दाऊद शेखला कुणी हिंमत दिली त्या शक्तीला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही- नितेश राणे
उरणमधील यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेखला कुणी हिंमत दिली त्या शक्तीला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेते नितेश राणेंनी आज दिला.
उरण येथे त्यांनी आज यशश्री शिंदेंच्या कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आरोपी दाऊद शेखच्या मागे शक्ती असल्याचं सांगितलं.

ही प्रवृत्ती ठेचावीच लागेल
नितेश राणे म्हणाले,गृहमंत्री जे करत आहेत, त्याला योग्य़ शिक्षा भेटेल. ही प्रवृत्तीच ठेचावी लागेल, त्यासाठी आम्ही सर्व शक्ती उभी करणार, आरोपीला कुणी ताकद दिली, त्याला कुणी हिमंत दिली याची नावे आम्हाला माहीत आहे. दाऊद शेखला मदत करणाऱ्यांची नावे आमच्याकडे आहे. हा दाऊद शेखपर्यंत थांबणारा विषय नाही, त्यामागील शक्तीला आम्ही संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही.
एवढा दरारा निर्माण व्हायला हवा
नितेश राणे म्हणाले, महिला कायदे कडक करण्यासाठी आमचे सरकार कार्य करत आहे, मुद्दा हा आहे की, हीच जर दुसऱ्या धर्माची मुलगी असती तर गाठीभेटी करेपर्यंत कुणी थांबलं नसतं उरण पेटवलं असतं. हिंदू समाजाने जागृत व्हायची गरज आहे. आपल्या समाजाकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू नये एवढा दरारा निर्माण व्हायला हवा या दृष्टीकोनातून मी येथे भेटीसाठी आलो आहे, पीडित कुटुंबाचे सांत्वन केलं आहे.
अंबादास दानवेंवर टीका
अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, ते बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं याची त्यांना लाज वाटायला हवी. बाळसाहेब आज असते तर त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य ऐकून घेतलं असतं का असा सवालही त्यांनी केला.
कुणी राजकारण करु नये, हा धार्मिक विषय
नितेश राणे म्हणाले, कुणी राजकारण करु नये. हा धार्मिक विषय आहे. लव्हजिहादचा विषय आहे. यानिमित्ताने आमच्या महिला , मुलींना टार्गेट करुन हिंदू समाजाचा टक्का कमी करायचा आहे.
गजवाये हिंदच्या अंतर्गत भारताला मुस्लिम राष्ट्र करायचं असा कट असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.
हे कोण करतं..सर्वांनाच माहीतेय
नितेश राणे म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर आता लव्ह जिहाद प्रकरणात कारवाई होत आहे. कर्नाटकातून आरोपीला अटक केली आहे. नवी मुंबईतील प्रकरणाबाबत मला माहिती नाही असेही ते म्हणाले. हिंदूंनी दरारा निर्माण करायलाच हवा. आज धारावीत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याचा खून झाला. त्यानंतर अत्यंयात्रेत दगडफेक झाली, हे कोण करतं हे सर्वांनाच माहीत आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications