राज्यात नेमकं झालंय काय? बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलंय
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्यांची माहिती समोर येत आहे. तर राज्यात सद्या बीड अन् परळी पॅटर्नचीच चर्चा रंगलेली आहे. अशातच, बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आणखी एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. टिप्परने सरपंचाला उडवून दिल्याने यात त्याचा मृत्यू झाला. नेमका हा अपघात की घातपात अशी चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे.
टिप्परच्या धडकेने सरपंच क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
राखेच्या वाहतुकीमुळे स्थानिकही त्रस्त..
शनिवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर स्थानिक चांगलेच संतप्त झाले आहे. राखेच्या काळाबाजाराने स्थानिक त्रस्त आहेत. राखेची वाहतूक करणारे टिप्पर, ट्रक हे उघड्याने राखेची वाहतूक करतात. त्यामुळे राख उडते आणि लोकांच्या डोळ्यात जाते. त्याशिवाय, राखेमुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी अटकेत
संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप झाले. त्यानंतर परळीतील अनेक बेकायदेशीर कृत्य, व्यवसाय यांच्या अनेक सुरस कथांची चर्चा सुरू झाली आहे. विद्युत केंद्रातील राखेचीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.












Click it and Unblock the Notifications