Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

..ही 2 मुस्लिम स्थळे वगळता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना!..शिंदे सरकारवर ओवेसींची कडाडून टीका

मुंबई - महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना आणली असून आता या योजनेनेचे एकीकडे स्वागत होत असतानाच टीकाही होत आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असुदोद्दीन ओवीसी यांनी या योजनेवरुन एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.

निवडणुका पाहून योजना..

ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकतात. याच पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे सरकार राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षित करण्यासाठी या योजना असल्याचे विरोधक मानत असून त्यांच्याकडून अशा धडाधड आणलेल्या योजनेसंदर्भात टीका केली जात आहे.

Asududdin Owaisi on Chief Minister Pilgrimage Scheme

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

निवडणुकीच्यो तोंडावर राज्य सरकार योजना आणत असल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, "सरकार विविध कल्याणकारी योजना सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी एक मध्यप्रदेशसारखी लाडकी बहना योजना आहे, मी त्याचे स्वागत करतो. पण राज्य सरकारने कुटुंबातील बहिणींसाठी योजना आणली. भावांनी काय केले. त्यांच्यासाठीही अशी योजना आणायला हवी.

राज्य सरकार घरात भांडणे लावत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. तसेच निवडणुका तोंडावर आल्यानंतर अशा योजना आणल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले ओवेसी?

असुदोद्दीन ओवीसी यांनी महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रासंदर्भात आणलेल्या योजनेवर टीका केली. महाराष्ट्र सरकारने 60 वर्षांवरील लोकांना मोफत तीर्थयात्रा देणारी "मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना" आणली आहे. 2 मुस्लिम स्थळे वगळता, काही गुरुद्वारा आणि चर्च ही हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत. हे तुष्टीकरण नाही का? ही "रेवडी" नाही का? जे श्रद्धावान आहेत ते ही तीर्थयात्रा स्वतः करू शकतात.

काय आहे योजना?

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत महाराष्ट्र सरकार साठ वर्षांवरील नागरिकांना तीर्थयात्रा घडवणार आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तीच्या राहण्याचा, प्रवासाचा आणि भोजनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेचा शासन निर्णय अर्थात जीआर 14 जुलैला काढण्यात आला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+