विधानसभेसाठी शरद पवारांचा मास्टरप्लॅन; लवकरच करणार राज्यव्यापी दौरा

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए ला बहुमत मिळालं.ते दुसरीकडे मात्र शरद पवार ,उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीने चांगली मुसंडी मारली.मविआला राज्यात 30 जागांवर विजय मिळाला. ते महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं.

Sharad Pawar

मविआमध्ये चैतन्य:

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतर मविआचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी अलीकडेच बारामती आणि इंदापूर परिसरात दौरे केले. यावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभेत सरकार आपल्या ताब्यात घेण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं. त्यानंतर मविआच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या सुरात सुरू मिसळला.

शरद पवारांच्या दौऱ्याचं महत्व:

आगामी संसद आणि विधानमंडळाच्या अधिवेशनानंतर शरद पवार दीर्घकालीन राज्यव्यापी दौरा करणार आहेत. यामध्ये पवार शेतकरी, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आदी मुद्द्यावर जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

गेल्या 2 वर्षांत भाजपने राज्यात केलेलं फोडाफोडीचे राजकारण, हक्काचे उद्योग परराज्यात जाणे, कांदाप्रश्न आदी मुद्दे पुढे करत पवार जनतेला साद घालतील.जनतेतून मविआच्या या प्रचाराच्या मुद्द्याला लोकसभेत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विधानसभेची प्रचाराची लाईन अगदी तंतोतंत राहण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा प्रश्न मविआच्या पथ्यावर?

मराठवाडा,विदर्भात आरक्षण प्रश्नाचा महायुतीला चांगलाच फ्टका बसला. दुसरीकडे राज्यात आता ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे - फडणवीस मराठा आणि ओबीसी समजतील असंतोष कमी करण्यात असफल ठरले, ते याचा थेट फायदा मविआला होईल.

शरद पवारांच्या साथीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेचे नेतेही राज्य पिंजून काढणार असल्याचं समजत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिली. त्यामुळे, जागावाटपात काँग्रेसचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.

महायुतीला फटका बसणार?

शरद पवारांच्या झंझावाती दौऱ्यामुळे महायुती बॅकफुटला फेकली जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. पवारांच्या या दौऱ्याचं नियोजन कसे असेल ते आगामी काळात स्पष्ट होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+