Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ashadhi Ekadashi 2025 : अबब! यंदा पंढरपुरात एवढ्या भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन, तुफान गर्दी

Ashadhi Ekadashi 2025 : लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भक्तांची पंढरपुरात मोठी मांदियाळी होती. यंदा असंख्य भाविकांनी लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. रेकाॅडतोड, तुफान गर्दीने विठुरायाची नगरी फुलली होती. यंदाची गर्दी अफाट होती. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच व्हिआयपी दर्शन नसल्याने विठ्ठालाचे दर्शनासाठी लागणारा वेळ यंदा ते सहा तासांनी कमी झाला.

Ashadhi Ekadashi 2025

यंदा गर्दीचा उच्चांक

यंदा आषाढीवारीसाठी दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होणार असे गृहीत धरुनच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूरच्या आषाढीवारीचे नियोजन करण्यात आले हेाते. यंदा वारीतील गर्दीने उच्चांक गाठला होता. यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून एआय प्रणालीव्दारे जमलेल्या गर्दी विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार यंदा आषाढी वारीसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याची माहिती समोर आली आहे.

यंदा पंढरपुरात किती भक्तांनी हजेरी लावली?

प्रशासनाने क्राऊड ॲनालिसिसच्या माध्यमातून यंदा पंढरपूरात एकादशी दिवशी जवळपास २७ लाख ३१ हजार ८३६ वारकरी दाखल झाल्याचा दावा केला आहे. यंदा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणात उपयुक्त पाणीसाठा जवळपास ७३% झाला होता. त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडले जात होते. यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण वाळवंट पाण्याखाली गेलेले होते. तसेच नीरा नदीचे पाणी व उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून चंद्रभागा नदी पात्रात पाणी आवश्यक त्या प्रमाणातच राहील यासाठी जिल्हाप्रशासनाने लक्ष घालून या पाण्याचे नियंत्रण व नियोजन केले होते.

यंदा पाच ते सहा तास लवकर दर्शन

यंदा पहिल्यांदाच व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा मोठा व धाडसी निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला. या निर्णयामुळे पदस्पर्श दर्शनाचा कालावधी किमान पाच ते सहा तासांनी कमीही झाला. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गावरील पालखी तळ तसेच विसावा ठिकाणी पावसामुळे चिखल होऊ नये यासाठी मागील वर्षीच्या अडीच पट मुरमीकरण करण्यात आले. तसेच पालखीतळावर ९४ वॉटरप्रूफ तर ११ जर्मन हँगर मंडप उभारण्यात आले. यातून ७ लाख ८५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली जी मागील वर्षी तीन लाख १२ हजार चौरस फुटाचे वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते, मागील वर्षीच्या अडीच पट जास्त वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते.

यंदा अशी होता व्यवस्था

यंदाची गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने ॲडव्हान्स मोबाईल टॉयलेट सिस्टीम उभी केलेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी साठी ३६०० मोबाईल टॉयलेट तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी २४०० मोबाईल टॉयलेट पुरवठा करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून १०० स्पेशालिस्ट डॉक्टरची सेवा वारीसाठी घेण्यात आली. यामध्ये बालरोग, स्त्रीरोग व अस्थिरोग तज्ञ विविध आजारावरील तज्ज्ञांचा समावेश होता. आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये ३ कोटी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

पालख्यांसाठी ४५०० मेडीकल किट वाटप

यंदा पालख्यांसाठी ४५०० मेडीकल किट वाटप करण्यात आलेले होते. यंदा आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख यांच्याशी चांगला समन्वय ठेवला

महिलांसाठी विशेष सुविधा

सर्व पालखी मार्ग, पालखी तळ, वाळवंट, वाखरी तसेच ६५ एकर व पंढरपूर शहरात महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले होत्या. महिलांसाठी स्वतंत्र २२५० स्नानगृहे उपलब्ध केलेली होती. जिल्ह्यात १५५ अहिल्यादेवी होळकर हिरकणी कक्ष निर्माण केली होते. या अंतर्गत स्तनदामाता साठी विशेष सुविधा उपलब्ध केली होती. त्याच ठिकाणी महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड ची व्यवस्था करून प्रत्येक हिरकणी कक्षामध्ये आरोग्य सेविका यांची नियुक्ती केलेले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+