Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

4 छापे ते चोरी अनिल परबांनी योगेश कदमांना धु-धु धुतलं! म्हणाले-"वेश्याव्यवसायाचा परवाना दिला नव्हता"

Anil Parabs criticism on Yogesh Kadam : सावली बार आणि रेस्टाॅरंटला परवाना बार आणि रेस्टाॅरंटसाठीच दिला होता तिथे डान्सबार चालवण्यासाठी दिला नव्हता, तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिलेला नव्हता. तिकडे वेश्याव्यवसायासाठी दिला नव्हता असा टोला लगावत बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत. पण तिथे डान्सबार चालत होता हे पोलिसांनी आतापर्यंतच्या मारलेल्या चार छाप्यातून स्पष्ट झाले आहे असे म्हणत त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी आज १ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

Anil Parabs criticism on Yogesh Kadam

..म्हणून सुटका होत नाही

अनिल परब म्हणाले, लायसन परवाना परत केला याचा अर्थ तरीही त्यांची या प्रकरणातून सुटका होत नाही. परवाना परत करुन योगेश कदम यांनी मान्य केले की, माझ्याकडे अवैध काम सुरु होते. जर अवैध काम सुरु नसेल तर परवाना परत करण्याचे काम काय होते, सुरुवातीपासून ते सांगत होते की, माझ्याकडे आर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे तर मग त्यांनी परवाना परत का दिला.

Take a Poll

चोराने चोरीचा माल परत दिला - परब

अनिल परब म्हणाले, या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे. त्याआधीच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिला आणि माझी यातून सुटका करा मी चोरीचा माल परत दिलेला आहे असा याचा अर्थ होतो असे म्हणत अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला.

परवाना परत दिला म्हणून सुटका होत नाही - परब

अनिल परब म्हणाले, कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे आणि त्यातून हे सिद्ध होते की, ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत, आणि ज्याची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यांवर आहे त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्यांच्या घरात चालू आहेत. त्यातून गृहराज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही. परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे अवैध गोष्टीतून त्यांची सुटका होत नाही.

वेश्याव्यवसायासाठी परवाना दिला नव्हता.. - परब

अनिल परब म्हणाले, सावली बार आणि रेस्टाॅरंटला परवाना बार आणि रेस्टाॅरंटसाठीच दिला होता तिथे डान्सबार चालवण्यासाठी दिला नव्हता, तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिलेला नव्हता. तिकडे वेश्याव्यवसायासाठी दिला नव्हता. बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत. पण तिथे डान्सबार चालत होता हे पोलिसांनी आतापर्यंतच्या मारलेल्या चार छाप्यातून स्पष्ट झाले आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या बारवर एकदा नाही चारवेळा छापे पडले

अनिल परब म्हणाले की, एकवेळ नाही तर चारवेळा गृहराज्यमंत्र्यांच्या बारवर छापे पडले आहेत. यात २०२३ मध्ये तीन आणि २०२५ मध्ये एकवेळ असे चार छापे पडलेले आहेत. आपण स्वतः पोलिसांना भेटलो व आतापर्यंत काय कारवाई केली हे मी विचारले, तेव्हा आज कळले की त्यांनी (योगेश कदम) यांनी परवावा परत केला. म्हणजे चोरीचा मुद्देमाल देत आमची सुटका करा असे आता ते म्हणत आहेत पण असे होणार नाही.

रक्षकच भक्ष्यक बनत आहेत - परब

गृहराज्यमंत्र्यावर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था असते त्यांच्या ती हातात आहे पण तेच आज कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवत आहेत. म्हणजेच रक्षकच भक्ष्यक झालेले आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच लाडकी बहिण योजनेत बहिणीचा मानसन्मान करतात आणि दुसरीकडे बार चालवत आया बहि‍णींची इज्जत घालवतात आता मला महाराष्ट्र सरकारची लाज वाटत आहे अशी टीका परब यांनी केली आहे.

गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा - परबांची मागणी

मुख्यमंत्र्‍यांची अजूनही वेळ गेलेली नाही, मी त्यांच्याकडे सर्व पुरावे दिले आहेत त्यांनी यावर तत्काळ कारवाई करुन गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही परब यांनी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+