शरद पवार सर्वात मोठे भ्रष्टाचारी! उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष! अमित शहांची टीका
मुंबई - शरद पवार सर्वात मोठे भ्रष्टाचारी असून दहा वर्षात शरद पवारांनी काय केले? उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असून संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांसोबत असल्याची बोचरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली. पुण्यात भाजपच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते.
शरद पवारांवर गंभीर आरोप
अमित शहा म्हणाले, सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. ते आमच्यावर काय आरोप करतात, या देशात भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचे काम जर कुणी केले तर ते शरद पवारांनी केले. आमच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. यावेळी शरद पवार तुमच्या खोटेपणाला माझे कार्यकर्ते जाणून आहेत. घरघर जाऊन आपल्याविरोधात खोटे बोलणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि विरोधकांचा पर्दाफाश करा. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, स्वतःला झोकून द्या आणि कमळाचे फुल उमलण्यासाठी प्रयत्न करा.एक-एक कार्यकर्ता कमळाला समर्पित व्हावा. परिश्रमाची शिकस्त करावी.

शरद पवारांनी काय केले?
अमित शहा म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडीचे काम आहे. मागच्या पाच वर्षात आम्ही एक ग्रॅमही दुधपावडर निर्यात होणार नाही, पण विरोधक खोटे आरोप लावत आहेत. खोटे नॅरेटीव्ह पसरवून विरोधक निवडणूक जिंकू पाहत आहे.भ्रष्टाचाराची ते गोष्ट करीत आहेत. मी शरद पवारांना विचारतो की, दहा वर्षात आपली सरकार होती, केंद्रात आपली सरकार होती.
दहा वर्षात आपण महाराष्ट्राला काय दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. हिशोबावर विश्वास नसेल तर कोणता चौक ते ठरवा आमचा माणूस तुम्हाला हिशोब देईल. महाराष्ट्रातील शहरांचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
जनता पवारांना संधी देणार नाही
अमित शहा यांनी यावेळी विकासाचा पाढा वाचला. शरद पवार सांगतात विकास केला. महाराष्ट्रातील सहकारी कारखाने शेतकऱ्यांची समृद्धी आहे पण पवारांनी जे दहा वर्षात केले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षात केले. देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. पवार म्हणतात यात नवीन काय आहे. मी म्हणतो त्यांनी करायचे पण त्यांना आता संधी नाही. जनता आम्हाला विजय मिळवून देणार आहे.
उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी
अमित शहा म्हणाले, औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारस म्हणतात, पण कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत ते आज आहेत. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले त्यांना लाज वाटायला हवी अशी जळजळीत टीका अमित शहा यांनी केली. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि देशाचा सुरक्षित करु शकत नाही फक्त सुरक्षा आम्हीच देऊ शकतो.
राहूल गांधींचा अहंकार तोडा
अमित शहा म्हणाले, अमित शहा म्हणाले, राहूल गांधींच्या खटाखट खटाखटवर जनतेने विश्वास ठेवला नाही. पण त्यांचे काही राज्यात सरकार आहे तिथे असे खटाखट पैसे पाठवा, तिकडे पैसे का पाहत नाही.मी व्यापाऱ्याचा मुलगा विजयाची गॅरंटी घेऊनच येथून वापस जाईल. एकदा जर आपण महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड जिंकला तर राहूल गांधींचा अहंकार तुटेल. देशात पुन्हा जोशात आणायचे असेल तर भाजपला विजयी करा. इतिहासातील सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा असून ती जबाबदारी आपल्यावर आहे.












Click it and Unblock the Notifications