Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राखीपौर्णिमेला सुप्रिया सुळेंकडून राखी बांधून घेणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..घ्या जाणून

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचा राज्यभरात उत्साह आहे. देशभरातल्या अनेक राज्यासंह महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी रक्षाबंधन साजरी करतात आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. चित्रपट अभिनेता, अभिनेत्री यांच्याप्रमाणेच राजकीय नेतेमंडळींच्या रक्षाबंधनाकडेही नागरिकांचं लक्ष असतं.अशातच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख अजित पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar Supriya Sule brother sister relationship rift Rakshabandhan Political Latest News

अजित पवार म्हणाले की "मी उद्या मुंबईत आहे. माझा जनसन्मान कार्यक्रम मुंबईमध्ये आहे. त्यामुळे माझ्या ज्या बहिणी मुंबईत आहेत त्यांच्याकडून मी राखी बांधून घेणार आहे. सुप्रिया उद्या मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जावून राखी बांधेन", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानुसार, सुप्रिया सुळे उद्या मुंबईत असल्या तर दोन्ही बहीण-भाऊ रक्षाबंधन सण साजरी करणार आहेत. पण सुप्रिया सुळे या उद्या नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट होते के पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार म्हणाले- माझी चूक झाली

अजित पवार यांनी गेल्या वर्षी शरद पवारांना आव्हान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून लढणाऱ्या सुप्रिया सुळे आणि यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या.

पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभे राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे होते. अखेर सुप्रिया सुळे याच मोठया फरकाने निवडून आल्या. निकाला लागल्यानंतर दोन महिन्यांनी रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच अजित पवार यांनी लोकसभेत माझ्याकडून चूक झाल्याची कबूली देत सुप्रियाविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होते, असे म्हटले, यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली.

अजित पवार पुन्हा काकांकडे जाणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नेत्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार पुन्हा एकदा आपल्या काकांशी हातमिळवणी करणार का, हा सगळ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे. मात्र या सगळ्यात मोठ्या प्रश्नावर आता अजित पवारांनी सडेतोड नुकतंच उत्तर दिलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अजित पवार यांनी नो कॉमेंट्स... म्हणत यावर अधिक बोलणं टाळलं आहे. तर अजित पवार पुढे असेही म्हणाले की, मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काम केलं. कोणत्या मतदारसंघात काय केलं याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळे मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+