Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मी घेतलेली भूमिका कोणाला दुखवण्यासाठी नव्हती, जो निर्णय घेतला तो साहेबांना विचारुनच घेतला- अजित पवार

पुणे : विधानसभेच्या निवडणूकीचे वारे राज्यात जोराने वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे राज्यभर दौरे आणि बैठका सुरु आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसम्मान यात्रा बारामती येथे पोहोचली. त्यावेळी त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

'मी घेतलेली राजकीय भूमिका कोणाला दुखवण्यासाठी नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच घेतला होता, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. ते बारामती येथे एका डॉक्टर मेळाव्यात बोलत होते. 'पवार साहेब आधी हो म्हणाले, नंतर नाही म्हणाले' मला अशी भूमिका घेता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं'. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. मात्र आता काय दोन पक्ष झाले आहेत. प्रत्येकाला शेवटी कुठं ना कुठं थांबावं लागतं,असा टोला ही टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

Ajit Pawar on sharad pawar

ही माझी चूकच झाली - अजित पवार

लोकसभा निवडणूकीच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. साहेबांच्या वयाचा विचार करत बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळेला मतदान केलं . शेवटी तो तुमचा मतदारांचा अधिकार आहे. मात्र लोकसभेच्या वेळी सुप्रियाच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, ती मी मान्य केली. आता मागचं सर्व विसरुन पुढे जायचे आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे

अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तूळात याबद्दल बरीच झाली. दोन दिवसापुर्वीच अजित पवार यांच्या ताफ्याला कार्यकर्त्यांनी घेराव घालत बारामतीमधून निवडणूक लढ्याचा आग्रह केला होता. पण अजित पवारांनी तुमच्या मनातील उमेदवार देणार असं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढवणार की, नाही याबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र आता चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हटलं आहे की,अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+