अजित पवारांचा तो 'शेवटचा' संवाद; 'या' नेत्यासोबत झाले होते अखेरचे बोलणे
राज्याच्या राजकारणातील एक मोठे वादळ शांत झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती विमानतळावर झालेल्या या भीषण दुर्घटनेपूर्वी दादांनी आपला शेवटचा फोन कॉल कोणाला केला होता, याची माहिती आता समोर आली आहे.

नातेवाईक आणि राजकीय सहकाऱ्याशी अखेरची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात प्रवेश करण्यापूर्वी अजित पवार यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना फोन केला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनाबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती. "मी पोहोचल्यावर नंतर फोन करतो," असे सांगत त्यांनी हा संवाद थांबवला होता. दुर्दैवाने, हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. राणाजगजितसिंह पाटील हे अजित पवारांचे जवळचे नातेवाईक (सुनेत्रा पवार यांचे भाचे) असल्याने या बातमीने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar Passes Away : विमान अपघातानंतर अजित पवारांची ओळख कशी पटली? काय काय सापडलं..
अपघाताचा थरार: नेमकं काय घडलं?
निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी ८ ते ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तांत्रिक बिघाड: लँडिंगच्या वेळी विमानात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली.
कॅश लँडिंग: विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात कोसळले.
भीषण आग: जमिनीवर आदळताच विमानाने पेट घेतला, ज्यात विमानातील पाचही जणांचा अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीकडे धाव घेतली होती.












Click it and Unblock the Notifications