Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ajit Pawar Passes Away : विमान अपघातानंतर अजित पवारांची ओळख कशी पटली? काय काय सापडलं..

Ajit Pawar Passes Away : संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या शब्दाचा आणि कामाचा दरारा निर्माण करणारं एक वादळ आज कायमचं शांत झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात अत्यंत दुर्दैवी आणि भीषण निधन झाले.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या लाडक्या 'दादा'ची तोफ धडाडताना पाहण्यासाठी आसुसलेल्या कार्यकर्त्यांच्या डो्ळ्यात आज पाणी आहे. लँडिंगच्या वेळी झालेल्या या भीषण स्फोटात विमानाचे अक्षरशः तुकडे झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. या अपघाताने केवळ बारामतीच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र आज अश्रूंच्या महापुरात बुडाला आहे.

Ajit Pawar Passes Away

नेमका अपघात कसा झाला?

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी बारामती दौऱ्यावर होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही वेळ आधी विमान आकाशात घिरट्या घालत होते. अचानक विमानावरचे नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर जोरात कोसळले. कोसळताच विमानाचा भीषण स्फोट झाला आणि आगीचे गोळे हवेत उसळले. विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

अशी पटली 'दादांची' ओळख

अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाला आणि प्रत्यक्षदर्शींना अजित पवारांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटवता आली. त्यांच्या हातातील ते खास घड्याळ त्यांची शेवटची ओळख ठरली. घटनास्थळावर विमानाचे अवशेष, अजित पवार ज्या सीटवर बसले होते तिचा भाग आणि काही अर्धवट जळालेली डायरी व कागदपत्रे सापडली आहेत.

राजकीय वर्तुळात शोककळा

अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले असून, सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :  अजित दादांचे 'ते' शेवटचे ट्विट अन् बारामतीचा 'विचित्र' योग; ज्या मातीने ओळख दिली, तिथेच अखेर.. 

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+